Marathawada Weather Update : मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने (Thunderstorm) जोरदार हजेरी लावली आहे. येत्या २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात अलर्ट जारी केला आहे. (Marathwada Weather Alert)
मराठवाड्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरणासोबत वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Marathwada Weather Alert)
विशेषत: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, या भागांत जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.(Marathwada Weather Alert)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) ने २७ मे ते ३१ मे या कालावधीत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(Marathwada Weather Alert)
मराठवाड्यात आज (२७ मे) रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये अनेक भागात वादळी वारा (वेग ४० ते ५० किमी/ता.) ने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर लातूर, धाराशिव जिल्ह्यांतही बऱ्याच ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उद्या (२८ मे) रोजी हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२९ मे (गुरुवार) रोजी हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२९ ते ३१ मे दरम्यान संपूर्ण मराठवाडा विभागातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत वाऱ्याचा वेग आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशी सुचना देण्यात आली आहे.
* शेतातील उघड्यावर ठेवलेला शेतमाल कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावा.
* आंबा, लिंबू, डाळिंब यासारख्या फळबागांना वाऱ्यापासून संरक्षण द्यावे.
* तातडीची फवारणी व मशागत टाळावी.
* तात्पुरत्या स्वरूपात पेरणी करणे टाळावे.
* पशुधानाच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करावी.
* आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन सज्ज.
* हवामानाचा सतत आढावा घ्या.
* शासनाच्या संदेशांवर विश्वास ठेवा, अफवांपासून दूर रहा.
* अत्यावश्यक असल्यास नजीकच्या तहसील किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील स्थानिक प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागानेही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टी, वीज कोसळणे व झाडे पडण्याच्या घटनांची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.