Marathwada Rain Update : मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुढील काही दिवस पावसाची मेहेरबानी होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Marathwada Rain Update)
त्यामुळे उभ्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तापमानातही गारवा जाणवेल.(Marathwada Rain Update)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मराठवाड्यात पावसाचे वातावरण राहणार असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.(Marathwada Rain Update)
२३ आणि २५ जुलैला नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसासह वादळी वाऱ्यांचा धोका असून, २६ जुलै रोजी जालना, बीड, परभणी व संभाजीनगर जिल्ह्यात तसाच पाऊस पडेल.(Marathwada Rain Update)
पावसाचे वितरण
२३, २५, २६ जुलै : काही ठिकाणी पाऊस.
२४ जुलै : तुरळक ठिकाणी पाऊस.
तापमानातही बदल होणार असून कमाल तापमानात पुढील ३-४ दिवसांत ३-४ अंशांनी घट होईल. मात्र, किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
विस्तारित अंदाजानुसार २५-३१ जुलै दरम्यान मराठवाड्यात पाऊस, कमाल व किमान तापमान सरासरीएवढेच राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता असल्याने उंच पिकांना आधार द्या.
* पेरलेल्या पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या.
* रोग व किडींपासून बचावासाठी पिकांची नियमित पाहणी करा.
* शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कामकाजाचे नियोजन करावे.