Join us

Marathwada Dam Water Level : पावसाची कृपा! जायकवाडी धरण किती भरले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:15 IST

Marathwada Dam Water Level : दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदा मुसळधार पावसाची मोठी भेट मिळाली आहे. जायकवाडीसह मानार, सीना-कोळेगाव, येलदरी, मांजरा आदी सर्व मोठी धरणे तुडुंब भरल्याने पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.(Marathwada Dam Water Level)

Marathwada Dam Water Level : दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदा मुसळधार पावसाची मोठी भेट मिळाली आहे. जायकवाडीसह मानार, सीना-कोळेगाव, येलदरी, मांजरा आदी सर्व मोठी धरणे तुडुंब भरल्याने पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. (Marathwada Dam Water Level)

यंदा तब्बल १ लाख ८८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.(Marathwada Dam Water Level)

दरवर्षी दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यास यंदा बाप्पाची कृपा लाभली आहे. मुसळधार पावसामुळे जायकवाडी सहित सर्व प्रमुख धरणे तुडुंब भरली असून पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. यामुळे शेतकरी, उद्योगधंदे आणि शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.(Marathwada Dam Water Level)

जायकवाडीचा ९९ टक्के साठा

मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प (पैठण, छत्रपती संभाजीनगर) हा ९९ टक्के भरल्याने त्याचे दरवाजे उघडावे लागले आहेत. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या प्रकल्पात आधीच ९० टक्क्यांहून अधिक पाणी जमा झाले होते. परिणामी, जायकवाडीमुळे यावर्षी सुमारे १ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

इतर धरणांची स्थिती

निम्न दुधना (परभणी) – ७५% पाणीसाठा, काही दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता

येलदरी – ९७% पाणी

सिद्धेश्वर – ९३% पाणी

माजलगाव (बीड) – ९५% पाणी

मांजरा (लातूर) – ९९% पाणी

पेनगंगा (नांदेड) – ९८% पाणी

मानार – १००% भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे

निम्न तेरणा – ९९% पाणी

विष्णुपुरी (नांदेड) – गतवर्षीच्या तुलनेत दीडपट पाणी, सध्या ७५% साठा

सीना-कोळेगाव (धाराशिव) – १००% भरल्याने गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला

सिंचन आणि पिण्याचे पाणी सुरक्षित

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच मोठ्या शहरांचे पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वसाहतींचा प्रश्न सुटल्याने शेतकरी व नागरिक दोघांनाही दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Nashik Dam Water : नाशिकची धरणे ओसंडले; मराठवाड्यासाठी किती टीएमसी आले पाणी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीमांजरा धरणमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकशेतकरी