Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी अखेरीस हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरडे आणि सूर्यप्रकाशित वातावरण असताना आता अनेक भागांत उष्णता आणि दमटपणा वाढू लागला आहे. (Maharashtra Weather Update)
काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचीही नोंद होत असून पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
मराठवाड्यात कोरडे आणि उष्ण वातावरण
औरंगाबाद आणि लातूर परिसरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांच्या दरम्यान राहील. रात्री काही प्रमाणात गारवा जाणवेल, मात्र दिवसाढवळ्या उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेसह ढगाळ वातावरण
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आंशिक ढगाळ वातावरण राहू शकते. तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान राहील.
सकाळ-संध्याकाळ वातावरण सुखद असले तरी दुपारी उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात दमट उकाडा
मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी भागात दमटपणा अधिक जाणवत आहे. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील; परंतु आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावसाची शक्यता असलेले भाग
कोकण पट्टा – रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही प्रमाणात मुंबई परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळू शकतात.
उत्तर महाराष्ट्र – नाशिक आणि आसपासच्या घाट भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्याचे काही भाग – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांची वाढ होऊन हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भातील काही भाग – अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांत वातावरण बदलल्यास स्थानिक पातळीवर हलका पाऊस होऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी सूचना
सध्या उष्णता वाढत असल्याने रब्बी पिकांना पाण्याची योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळेत फवारणी टाळावी. सकाळी किंवा संध्याकाळी शेतीची कामे करावीत.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
* पुरेसे पाणी प्या.
* थेट उन्हात दीर्घकाळ थांबणे टाळा.
* हलके, सुती कपडे वापरा.
* ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी.
महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागली असून पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
Web Summary : Maharashtra is experiencing shifting weather. Stay updated for the latest forecasts and potential impacts on daily life. Be prepared for possible changes.
Web Summary : महाराष्ट्र में मौसम बदल रहा है। नवीनतम पूर्वानुमानों और दैनिक जीवन पर संभावित प्रभावों के लिए अपडेट रहें। संभावित परिवर्तनों के लिए तैयार रहें।