Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra dam water level : धरणात पाणीसाठा वाढला, तरी टंचाईची शक्यता का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:58 IST

Maharashtra dam water level : राज्यातील धरणांमध्ये यंदा पाणीसाठा वाढलेला दिसत असला, तरी टंचाईची भीती पूर्णपणे दूर झालेली नाही. वाढते तापमान, जलसाठ्याचे बाष्पीभवन आणि कमी पावसाचा अंदाज या कारणांमुळे पुढील काही महिन्यांत परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि काटकसरीचा वापर अत्यंत गरजेचा ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.(Maharashtra dam water level)

Maharashtra dam water level : राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या मिळून सुमारे ३०२८ धरणांमध्ये ३० एप्रिल २०२६ अखेर ३९.६२% (५७१.४६७ टीएमसी) इतका उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व सिंचन तज्ज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.(Maharashtra dam water level)

विशेष म्हणजे, हा साठा मागील वर्षीच्या तुलनेत ५.१४% (७४.१३५ टीएमसी) ने अधिक आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी हा साठा ३४.४८% (४९७.३२९ टीएमसी) इतकाच होता.(Maharashtra dam water level)

विभागनिहाय पाणीसाठा स्थिती

राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये पाणीसाठ्याचे चित्र पुढीलप्रमाणे आहे

अमरावती विभाग : ४७.६४% (६६.०५७ टीएमसी) – सर्वाधिक साठा

मराठवाडा : ४४.२५% (११३.८७९ टीएमसी)

नागपूर : ४३.८३% (७३.०२७ टीएमसी)

कोकण : ४२.८२% (५६.०२२ टीएमसी)

नाशिक : ४१.८०% (८७.९०७ टीएमसी)

पुणे : ३२.४०% (१७४.५६५ टीएमसी) – सर्वात कमी साठा

प्रमुख धरणांतील स्थिती काय?

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये साठा पुढीलप्रमाणे आहे.

जायकवाडी : ३६.७२ टीएमसी (४७.८४%)

कोयना : २७.८५ टीएमसी (२७.८२%)

उजनी : ६.०२७ टीएमसी (११.२४%) इतर महत्त्वाचे प्रकल्प

गोसीखुर्द – ४९.७५%

पेंच – ५३.४३%

गिरणा – ४७.६६%

मध्य वैतरणा – ५१.२५%

भातसा – ४४.१२%

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यातील सुमारे १३ प्रमुख प्रकल्पांमध्ये एकूण २७.७८ टीएमसी पाणीसाठा असून तो गतवर्षीपेक्षा ६.०० टीएमसी ने अधिक आहे.

भंडारदरा – ४५.२१%

निळवंडे – ५५.९९%

मुळा – ५२.६४%

आढळा – ५७.०८%

सीना – ५०.२९%

घोड – ३२.३८%

बाष्पीभवनामुळे चिंता वाढली

उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून, जायकवाडी धरणातून दररोज सुमारे ८० दशलक्ष घनफूट पाणी कमी होत आहे. दरमहा अंदाजे २.५ ते ३ टीएमसी पाण्याचा व्यय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे.

कमी पावसाचा अंदाज; प्रशासन सतर्क

हवामान खात्याने यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागांना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

शहरांसाठी महत्त्वाची माहिती

पुण्यासाठी महत्त्वाच्या खडकवासला धरणसमूहात ३५.२२% साठा (१०.२७ टीएमसी)

नाशिक जिल्ह्यात एकूण ४०.१५% साठा

गंगापूर – ५१.१९%

दारणा – ३९.२१%

कडवा – २९.३५%

राज्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक असला, तरी वाढते तापमान, बाष्पीभवन आणि कमी पावसाचा अंदाज यामुळे परिस्थिती पूर्णपणे दिलासादायक नाही.

उन्हाळा आणि आगामी काळ लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर आणि योग्य नियोजन अत्यावश्यक ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada water crisis : पाणी असूनही टंचाई; मराठवाड्यात गंभीर स्थिती उघड!

अधिक वाचा : Maharashtra water storage : मराठवाड्यात पाण्याची नेमकी स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Dams: Water levels rise, but why is scarcity still feared?

Web Summary : Maharashtra dams have more water than last year, yet drought looms. High evaporation and a predicted weak monsoon necessitate careful water management and conservation across regions like Pune and Marathwada.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजशेतकरीशेती