Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Republic Day Weather : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Republic Day Weather : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Latest News light Rain in same parts of the maharashtra on Republic Day, read weather forecast | Republic Day Weather : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Republic Day Weather : प्रजासत्ताक दिनी राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Republic Day Weather : अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता असुन काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते. 

Republic Day Weather : अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता असुन काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते. 

Republic Day Weather : उद्या व परवा सोमवार- मंगळवार दि.२६-२७ जानेवारी ला महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छ.सं.नगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती अशा ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरणाची शक्यता असुन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 

नंतरची तेथील थंडी              
दरम्यानच्या कालावधीत व त्यानंतरही ह्या ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात, शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी पर्यंतच्या १२ दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून सध्या जाणवत असलेल्या थंडीपेक्षा तेथे कमी थंडी जाणवेल. 

खालील ठिकाणी पुढील ४ दिवस थंडी कायम             
उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत मात्र गुरुवार दि. २९ जानेवारीपर्यंत सध्या जाणवत असलेल्या थंडीसारखीच थंडी जाणवेल. मात्र   दि. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी (शुक्रवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ८ दिवसात ह्या २५ जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जाणवते. 
    
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील थंडी          
शनिवार दि. ७ फेब्रुवारी पासुन उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता हळूहळू पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते. ह्याबाबत त्यावेळी सविस्तर खुलासा करता येईल. 

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title : गणतंत्र दिवस का मौसम: महाराष्ट्र के कुछ हिस्सों में बारिश की संभावना

Web Summary : गणतंत्र दिवस पर महाराष्ट्र के ग्यारह जिलों में बादल छाए रहने और हल्की बारिश की संभावना है। 6 फरवरी तक तापमान में थोड़ी वृद्धि होने से ठंड कम होगी। 7 फरवरी के बाद, कुछ उत्तरी जिलों को छोड़कर, ठंड फिर से बढ़ सकती है।

Web Title : Republic Day: Rain Likely in Parts of Maharashtra, Weather Forecast

Web Summary : Republic Day may bring cloudy weather and light rain to eleven Maharashtra districts. A slight temperature increase is expected until February 6th, reducing the cold. After February 7th, cold weather may return, excluding some northern districts.