Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Weather Report : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर 

Weather Report : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर 

Latest news Light rain forecast for next five days in Nashik district, read in detail | Weather Report : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर 

Weather Report : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यात 09 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविली आहे. 

नाशिक जिल्ह्यात 09 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविली आहे. 

राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून दुसरीकडे पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे. मागील हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर आता 09 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविली आहे. 

विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्ष्यात घेता दि. १२ व १३ एप्रिल २०२४ रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच उर्वरित दिवस हवामान थोडे उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३५-३६ डिग्री से. व किमान तापमान १८-१९ डिग्री से. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १०-१२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता व स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकर्यांनी दि. १२ एप्रिल २०२४ आधीच रबी पिकांची कापणी/मळणी त्वरित पूर्ण करावी तसेच कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लॉस्टिक/ ताडपत्रीने झाकून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

उन्हाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी? 

उन्हाळी पिकात सूक्ष्म सिंचनाचा (उदा. तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा. उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांस खुरपणी देऊन नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. नवीन लावलेल्या फळझाडांना गवताचे शेड करून तीव्र सुर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी दि. १२ एप्रिल २०२४ आधीच रब्बी पिकांची कापणी/मळणी त्वरित पूर्ण करावी तसेच कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून ठेवावे.

शेतकऱ्यांना काय सल्ला? 

हवामानाचा अंदाज इशारा लक्षात घेता रबी/फळ पिकांच्या कामांची (उदा. कापणी/मळणी इ.)आखणी दि. १२ एप्रिल आधी किंवा दि. १३ एप्रिल नंतर करावी. वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा. धान्य कडक उन्हात वाळवून साठवणूक करावी. साठवणुकीच्या वेळी औषध वापरावे. कापणी केलेल्या द्राक्ष बागेतील रोपांची एप्रिल छाटणी सुरु करावे आणि रोपांची छाटणी नंतर १ टक्के B. M. (बोर्डोमिश्रण) ची फवारणी करावी. नवीन लावलेल्या फळझाडांना गवताचे शेड करून तीव्र सुर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (८० ते ८५ % पक्व ) आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारनंतर करावी. शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी. 

   
 सौजन्य     
ग्रामीण कृषी मौसम सेवा            
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,           
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 
ता. इगतपुरी, जि. नाशिक

Web Title: Latest news Light rain forecast for next five days in Nashik district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.