Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

Latest news Kikvi Dam project gaining momentum, Land acquisition started see current status | बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

Kikvi Dam Project : धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे.

Kikvi Dam Project : धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे.

नाशिक : गत दोन दशकांपासून चर्चेत असूनही प्रलंबित राहिलेल्या किकवी धरणाला प्रस्तावित कुंभमेळ्यापूर्वी गती लाभण्याची चिन्हे आहेत. या धरणातून नाशिक शहराला २.४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. 

त्यासाठी किकती धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे किमान सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी धरणांची पायाभरणी पूर्णत्वास जाणार असल्याने बहुप्रतीक्षित धरण होण्याच्या दिशेने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे.

किकवी धरण नाशिक महापालिकेला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मंजूर करण्यात आले असून, निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर प्रकल्प न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने त्याला विलंब झाला होता. मात्र, किकवी धरणाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ७५ टक्के पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. 

या धरणासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे, ब्राह्मणवाडे, पिंप्री, घुमोडी, शिरसगाव, काचुर्ली, सापगाव, पिंपळद, तळेगाव, अंबोली आदी गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे.

- हे आहेत किकवीचे फायदे
किकवीमुळे नाशिक शहराची २०५५ पर्यंतची पाण्याची गरज भागू शकणार आहे. या प्रकल्पामुळे शहरामधून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूरनियंत्रण, ०.५० मेगावॅट वीजनिर्मिती तर आदिवासी क्षेत्रात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

गंगापूरसाठी बॅक सपोर्ट
नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण पूर्ण होऊन तब्बल ६५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे या धरणात गाळसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. मेरीच्या २००२ मधील अहवालानुसार गंगापूर धरणाच्या जिवंत साठ्यामधून तब्बल १५४५ दलघफू साठा कमी झाला आहे.

हा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर २.४ टीएमसी क्षमेतेचे नवीन धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी राज्य शासनाने २००९ मध्ये म्हणजे १७ वर्षांपूर्वी २८३.५४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती.

Web Title : किकवी बांध परियोजना ने पकड़ी गति: 2055 तक नासिक की पानी की जरूरतें होंगी पूरी

Web Summary : लंबे समय से प्रतीक्षित किकवी बांध परियोजना ने गति पकड़ी, जिसका लक्ष्य नासिक को 2.4 टीएमसी पानी की आपूर्ति करना है। भूमि अधिग्रहण शुरू हो गया है, जिसका लक्ष्य अगले कुंभ मेले से पहले पूरा करना है। बांध 2055 तक नासिक की पानी की आपूर्ति सुनिश्चित करेगा, साथ ही बाढ़ नियंत्रण और बिजली उत्पादन में भी मदद करेगा।

Web Title : Kikavi Dam Project Gains Momentum: Addressing Nashik's Water Needs Until 2055

Web Summary : The long-awaited Kikavi Dam project is gaining traction, aiming to supply Nashik with 2.4 TMC of water. Land acquisition has begun, targeting completion before the next Kumbh Mela. The dam will secure Nashik's water supply until 2055, also aiding flood control and power generation.