Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रथमच सर्व १० दरवाजे उघडले गेले आहेत. तब्बल १६,९५१ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.(Katepurna Dam Water Level)
गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरण जलाशय झपाट्याने भरू लागला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरण प्रशासनाने रविवारी (१८ ऑगस्ट) सर्व १० दरवाजे दोन फुटांनी उघडले असून, नदीपात्रात तब्बल १६,९५१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.(Katepurna Dam Water Level)
पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला
१६ ऑगस्टच्या मध्यरात्री २ दरवाजे उघडून ८५ घनमीटर/सेकंद विसर्ग सोडण्यात आला.
१७ व १८ ऑगस्ट रोजी मालेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे विसर्ग सुरूच ठेवण्यात आला.
१८ ऑगस्ट सकाळी ८.३० वाजता आणखी ६ दरवाजे उघडले.
दुपारी ३.३० वाजता धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढल्याने उर्वरित ४ दरवाजेही उघडावे लागले.
जलसाठ्याची स्थिती
१८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता धरणाचा जलसाठा असा आहे.
पाणीपातळी : ३४७.२५ मीटर
साठा : ७८.२३० दशलक्ष घनमीटर
क्षमता : ९०.५९ टक्के
यंदाच्या हंगामात प्रथमच सर्व १० दरवाजे एकाच वेळी उघडले गेले आहेत.
परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कोंडाळा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरणाचा जलसाठा जलदगतीने वाढत आहे. विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे अवाहन करण्यात आले आहे.