Join us

Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; संभाजीनगर, बीड, जालना, परभणीला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:22 IST

Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Level)

Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. (Jayakwadi Dam Water Level)

सलग दुसऱ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, मराठवाड्यातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दूर होणार आहे. (Jayakwadi Dam Water Level)

मराठवाड्याच्या जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात यंदा दमदार जलसाठा झाला असून, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले.  (Jayakwadi Dam Water Level)

सध्या धरण ९२ टक्क्यांपर्यंत भरले असून सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरण्याच्या तयारीत आहे. धरणातून सध्या ९ हजार ४३२ क्युसेक वेगाने पाणी गोदापात्रात विसर्ग सुरू आहे. (Jayakwadi Dam Water Level)

सध्या धरणातील साठा किती आहे?

एकूण साठा: २७१३.४० दलघमी

जिवंत साठा: १९७५.२९ दलघमी

सध्या आवक: १६,२३० क्युसेक

विसर्ग: ९,४३२ क्युसेक

उघडलेले दरवाजे: १८ (अर्धा फूट)

ऊर्ध्व पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाचा परिणाम

नाशिक व अहिल्यानगर परिसरातील जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत आहे. जुलै अखेरपर्यंत जायकवाडी ९२ टक्क्यांपर्यंत भरले असून पुढील काही दिवसांत शंभर टक्के क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

४ जिल्ह्यांचा पाणीप्रश्न सुटणार

धरण भरल्याने सिंचनाला फायदा होणार आहे.

शहर व औद्योगिक वापरासाठी : छत्रपती संभाजीनगर, जालना

सिंचनासाठी : बीड, जालना, परभणी, संभाजीनगर जिल्ह्यांतील १.८८ लाख हेक्टर क्षेत्र

औद्योगिक वसाहती : जालना, शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा

जलपूजन व उद्घाटन सोहळा

धरणाच्या सध्याच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते धरणाचे दरवाजे उघडताना जलपूजन सोहळा पार पडला.

समुद्रात जाणारे ६५ टीएमसी पाणी वाचवण्याचा संकल्प

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गोदावरी नदीतून समुद्रात वाया जाणारे ६५ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पात वळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत.

हा उपक्रम यशस्वी झाल्यास जायकवाडीचे जलसंचय अधिक सक्षम होईल.

मराठवाड्यात कमी पावसाची नोंद

यंदाच्या जून-जुलै महिन्यांत मराठवाड्यात फक्त ३४० मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी अपेक्षित सरासरी (३९० मिमी) पेक्षा सुमारे १० टक्क्यांनी कमी आहे. मात्र, उर्ध्व क्षेत्रात पावसामुळे धरणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

शहराला दोन वर्षांचा पाणीसाठा उपलब्ध

शहरासाठी दररोज १५० एमएलडी पाणीउपसा

त्यातील सुमारे २५ टक्के गळती असून १२०-१३० एमएलडी पाणी वापरात येते

उद्योग व पिण्यासाठी दररोज ३ दलघमी पाण्याची गरज

या आकडेवारीनुसार धरणातील साठा किमान २ वर्ष पुरेल

पाणीपुरवठा योजनांचा आधार

जायकवाडी प्रकल्पावर ४२ लहान-मोठ्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. सुमारे २ लाख शेतकरी आणि शेकडो गावे या प्रकल्पावर अवलंबून आहेत.

जायकवाडी प्रकल्प सलग दुसऱ्यांदा भरत असल्याने पिण्याचे, सिंचनाचे आणि औद्योगिक पाण्याचे प्रश्न सुटले आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, पुढील नियोजन आणि साठवणुकीच्या दृष्टीने शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरण भरलं काठोकाठ; आज उघडणार दरवाजे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीमराठवाडापरभणीबीडजालनाऔरंगाबाद