Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. (Jayakwadi Dam Water Level)
जायकवाडी धरणात बुधवारी संध्याकाळपासून गोदावरीतून ५७ हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत असून, धरणाचा साठा ६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water Level)
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत साठा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पसरले आहे.(Jayakwadi Dam Water Level)
नाशिक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीतून पैठणच्या जायकवाडी धरणात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ५७ हजार ३६० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, धरणातील पाणीसाठा ६६.३९ टक्के झाल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.(Jayakwadi Dam Water Level)
जायकवाडी धरणात ८ दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी धरणात नागमठाण येथून ३२ हजार ३६० क्युसेक तर मधमेश्वर देवगड बंधाऱ्यातून १४ हजार २३८ क्युसेकसह धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी असे एकूण ५७,३६० क्युसेकने आवक सुरू आहे. (Jayakwadi Dam Water Level)
त्यामुळे धरणातील पाणीसाठा ६६.३९ टक्के झाला. धरणाची पातळी १५१५.३१ फुटांवर पोहोचली. धरणात एकूण पाणीसाठा २१७९. ३८७ दलघमी झाला असून, जिवंत पाणीसाठा १४४१.२८१ दलघमीवर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water Level)
गुरुवारी (१० जुलै) रोजी पाणीसाठा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे, असे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले.