Join us

Nashik Dam Storage : नाशिकहून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:40 IST

Nashik Dam Storage : नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात  (Nashik District) जुलैच्या मध्यानंतर पावसाने आठ दिवस विश्रांती घेतली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

जिल्ह्यातील धरणांत समाधानकारक जलसाठा असून नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीला (Jayakwadi Dam) सोडण्यात आले आहे. आजमितीस जायकवाडी धरण ९४.०३ टक्क्यांवर आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून दमदार पावसाला (Rain alert) सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील २७ पैकी ९ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यंदा पहिल्यांदाच चार प्रकल्प जुलैअखेरपर्यंत शंभर टक्के क्षमतेने भरल्याने पाणीटंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे. यंदा पर्जन्यमान अधिक असल्याने जुलैच्या मध्यापासूनच जिल्ह्यातील ९ मध्यम धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. 

यामध्ये गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड धरण समूहातील वाघाड, दारणा धरण समूहातील भावली, वालदेवी आणि भाम, तसेच गिरणा खोरे धरण समूहातील हरणबारी आणि केळझर यांचा समावेश आहे. नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले आहे.

ऑगस्टमध्ये विश्रांतीश्रावण मासारंभ झाला असून तेव्हापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती, तर जुलैच्या मध्यानंतर पावसाने आठ दिवस विश्रांती घेतली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

जुलै मध्ये जोरदार पाऊसजुलै महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ७ मोठ्या आणि १९ मध्यम धरणप्रकल्पांत जलसाठा वाढू लागला आहे.  गंगापूर धरण प्रकल्पांतील काश्यपी धरणात १०० टक्के, गौतमी गोदावरीत ९९ टक्के, तर आळंदी धरणांत १०० टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणहवामान अंदाजपाऊसधरणनाशिक