उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने धरणाचीपाणी पातळी वाढविली आहे.(Isapur Dam Water Release)
शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान धरणाची पातळी ४४०.९६ मीटर नोंदविण्यात आली आहे. धरणाची एकूण उपयुक्त साठ्याची क्षमता ९६०.२७३८ दशलक्ष घनमीटर असून, सध्या धरण साठा ९९.६० टक्के भरला आहे. मागील १२ तासांत २१.६१५२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. (Isapur Dam Water Release)
या परिस्थितीमुळे धरण प्रशासनाने इसापूर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे. धरण ओसंडून वाहण्याच्या स्थितीत पोहोचल्यामुळे सांडव्याचे १३ दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटर उचलले गेले आहेत. (Isapur Dam Water Release)
यामुळे सध्या पाण्याचा विसर्ग २२ हजार ६२ क्युसेक्स (६२४.७०९ क्युमेक्स) या वेगाने सुरू आहे. विसर्ग पूर्णपणे नियंत्रित असून, प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहे.(Isapur Dam Water Release)
नदीकाठच्या गावांसाठी इशारा
नदीपात्रात पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नदीपात्राजवळ जाऊ नका
जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा
रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्या
उमरखेड तहसील आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्या साठ्याचा तपास सतत करत आहेत आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नियंत्रित स्वरूपात सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
यामुळे पावसाळ्यातील वाढत्या पाण्याच्या आवकामुळे स्थानिक नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे प्रशासन स्पष्ट करीत आहे.