Lokmat Agro >हवामान > Gangapur Dam : गंगापूर धरणांतून जायकवाडीला किती पाणी गेलं? नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 

Gangapur Dam : गंगापूर धरणांतून जायकवाडीला किती पाणी गेलं? नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 

Latest news How much water went to Jayakwadi from Gangapur dam Dam storage in Nashik district | Gangapur Dam : गंगापूर धरणांतून जायकवाडीला किती पाणी गेलं? नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 

Gangapur Dam : गंगापूर धरणांतून जायकवाडीला किती पाणी गेलं? नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 

Gangapur Dam : आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांत जवळपास ४३.२७ जलसाठा जमा झाला आहे.

Gangapur Dam : आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांत जवळपास ४३.२७ जलसाठा जमा झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Gangapur Dam : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांत जवळपास ४३.२७ जलसाठा जमा झाला आहे. तर गंगापूर (Gangapur Dam) धरणात ५९.२४ टक्के जलसाठा झाला आहे. धरणातून सध्या १७६० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

जून महिन्यात सलग तीन आठवडे पावसाने हजेरी लावली. यामुळे जून महिन्यातच गंगापूर धरण ५० टक्केच्या वर पोहोचले होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच गोदावरी नदीत (Godawari River) विसर्ग सुरू आहे. 

मागील वर्षी आजच्या दिवशी गंगापूर धरणात केवळ १७.१० टक्के इतका जलसाठा होता. तसेच एकूण धरणांची जलसाठा पाहिला तर केवळ ७.६३ टक्के होता. यंदा मात्र अधिकचा जलसाठा असल्याचे चित्र आहे. 

गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात ५६.५९ टक्के, पालखेड धरणात ५६.६६ टक्के, ओझरखेड धरणात ३५.३१ टक्के, दारणा धरणात ५३.४१ टक्के, भावली धरणात ७९.२२ टक्के तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात ३२.६८ टक्के, चणकापूर धरणात ४६.९३ टक्के, केळझर धरणात ६५.३८ टक्के, गिरणा धरणात २९.४३ टक्के असा प्रमुख धरणांचा जलसाठा आहे. 

सध्या नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ६२० क्युसेक, दारणा धरणातून ३५३६ क्युसेक, पालखेड धरणातून १३६८ क्युसेक, कडवा धरणातून ७९५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 

Web Title: Latest news How much water went to Jayakwadi from Gangapur dam Dam storage in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.