Join us

Heavy Rains in Marathwada : पंधरवड्यांनंतर पावसाची जोरदार हजेरी; मराठवाड्यात ३० मंडळांत मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:39 IST

Heavy Rains in Marathwada : पंधरा दिवसांच्या खंडानंतर अखेर मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळपर्यंत ३० मंडळांत अतिवृष्टीची नोंद केली. ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Heavy rains in Marathwada)

Heavy rains in Marathwada : पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत ३० मंडळांत दाणादाण उडविली. (Heavy rains in Marathwada)

छत्रपती संभाजीनगर शहरात १४.४ मि.मी. तर ९.१ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. उर्वरित जिल्ह्यात दमदार पाऊस झाला.(Heavy rains in Marathwada)

जुलैच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरविली. सोमवारी रात्रीच्या सुमारास मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला. (Heavy rains in Marathwada)

सकाळपर्यंत २६.१ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४३.८ मि.मी पाऊस परभणी जिल्ह्यात, तर सर्वात कमी ९.१ मिमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला.(Heavy rains in Marathwada)

अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालन्यातील ६, बीडमधील ६, लातुरातील १, धाराशिव २, नांदेड २, परभणी ९, हिंगोली ४ मंडळांमध्ये ६५ पेक्षा अधिक पाऊस बरसला. (Heavy rains in Marathwada)

मंगळवारी देखील विभागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी सकाळपासून मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू होता.(Heavy rains in Marathwada)

सर्वाधिक ४३.८ मि.मी. पाऊस परभणी

सर्वात कमी ९.१ मि.मी. छत्रपती संभाजीनगर

शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. तर, दुपारनंतर दमट वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. सायंकाळी ७ वाजेनंतर आभाळ भरून आले. नंतर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

सोमवारी रात्रीतून १४.८ मि.मी. पावसाची नोंद शहरात झाली. तर, मंगळवारी दिवसभरात १.३ मि.मी. पाऊस झाल्याचे चिकलठाणा वेधशाळेने कळविले. रात्री ९ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने थोडी उघडीप दिली. पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला.

पिकांना दिलासा

मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामासाठी जमीन ओलावली असून पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Rain Update : शेतकऱ्यांसाठी अलर्ट: मराठवाड्यात पाऊस आणि वादळी वारे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडापाऊसपाणीशेतकरीशेतीखरीप