Join us

नाशिक जिल्ह्यातील अकरा धरणे 100 टक्के भरली, गंगापूर धरण किती टक्क्यांवर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:40 IST

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण २६ प्रकल्पांमध्ये ७९.६५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Nashik Dam Storage :  आज ३० जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण २६ प्रकल्पांमध्ये ७९.६५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर मागील वर्षी या दिवशी हा साठा केवळ ३५.६३ टक्क्यांवर होता. तर जवळपास ११ धरण १०० टक्के भरले असून गंगापूर (gangapur Dharan) धरण यामध्ये ७८.२० टक्क्यांवर आले आहे. 

मागील तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची सतंतधार सुरूच आहे. यामुळे पुन्हा एकदा धरणांतील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण २६ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.

यामध्ये गंगापूर धरण समूहातील कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी पालखेड धरण समूहातील वाघाड भावली, वालदेवी, नांदूर मध्यमेश्वर, भाम, भोजापूर तसेच गिरणा खोरे धरण समूहातील हरणबारी, केळझर ही जवळपास ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत. 

पालखेड धरण ६८.१५ टक्के, करंजवण ७७.४९ टक्के, ओझरखेड ८५.२१ टक्के, पुणेगाव ७८.८९ टक्के, दारणा ८६.३३ टक्के, मुकणे ९३.०५ टक्के, कडवा ९२.६ टक्के, चनकापूर धरण ६७.९४ टक्के, नागासाक्या धरण ४३.३२ टक्के, गिरणा धरण ६०.१२ टक्के, पुनद धरण ४४.७३ टक्के तर माणिकपुंज धरण ९९.७६ टक्के भरले आहे.

टॅग्स :गंगापूर धरणहवामान अंदाजपाऊसधरणनाशिक