Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > El Nino Phase : एल निनोचे संकट - प्रभाव कमी करण्यासाठी कृषी उपाययोजना, जाणून घ्या सविस्तर 

El Nino Phase : एल निनोचे संकट - प्रभाव कमी करण्यासाठी कृषी उपाययोजना, जाणून घ्या सविस्तर 

Latest News El Nino crisis Agricultural measures to reduce its impact, know in detail | El Nino Phase : एल निनोचे संकट - प्रभाव कमी करण्यासाठी कृषी उपाययोजना, जाणून घ्या सविस्तर 

El Nino Phase : एल निनोचे संकट - प्रभाव कमी करण्यासाठी कृषी उपाययोजना, जाणून घ्या सविस्तर 

El Nino Phase : 'एल निनो' (El Niño) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतीवर संकट येण्याची शक्यता असते.

El Nino Phase : 'एल निनो' (El Niño) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतीवर संकट येण्याची शक्यता असते.

El Nino Phase :  हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या 'एल निनो' (El Niño) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतीवर संकट येण्याची शक्यता असते. हे संकट टाळण्यासाठी आणि उत्पादनातील घट रोखण्यासाठी संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी (जि. नांदेड) यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण तांत्रिक उपाययोजना सुचवल्या आहेत.

महत्त्वाच्या उपाययोजना : 

१. मृदा आणि पाणी संवर्धन - 
- उताराला आडवी मशागत आणि समतल मशागत करणे.
- बंदिस्त बांध व संरक्षित सरी पद्धतीचा अवलंब.
- पीक अवशेषांचे आच्छादन करून जमिनीत ओलावा टिकवणे.

२. जल व्यवस्थापन - 
- शेततळे निर्माण करणे आणि पाणी साठवणुकीचे नियोजन.
- ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर.
- कमी कालावधीच्या व दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड.

३. कृषी यांत्रिकीकरण व पीक व्यवस्थापन - 
- झिरो टिल सीड ड्रिल आणि रिजन-फरो प्लांटरचा वापर.
- मृदा चाचणीनुसार संतुलित खत व्यवस्थापन.
- आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून जोखीम कमी करणे.

४. आधुनिक तंत्रज्ञान -
- हवामान अंदाजावर आधारित पेरणीचे नियोजन.
- AI आधारित रोग व कीड निदान तंत्रज्ञान.
- स्मार्ट सिंचन आणि सेन्सर आधारित पाणी व्यवस्थापन.

- कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड

Web Title : एल नीनो संकट: प्रभाव कम करने के लिए कृषि उपाय, विस्तृत जानकारी

Web Summary : एल नीनो से बारिश कम होने से कृषि खतरे में पड़ सकती है। मृदा और जल संरक्षण, कुशल सिंचाई, सूखा प्रतिरोधी किस्मों और संतुलित उर्वरक का उपयोग करें। जोखिम कम करने के लिए अंतरफसल और मौसम आधारित बुवाई जैसी आधुनिक तकनीकों को अपनाएं।

Web Title : El Nino Crisis: Agricultural Measures to Reduce Impact, Detailed Information

Web Summary : El Nino may reduce rainfall, threatening agriculture. Utilize soil and water conservation, efficient irrigation, drought-resistant varieties, and balanced fertilization. Adopt intercropping and modern technologies like weather-based planting for risk reduction. Follow Krishi Vigyan Kendra's guidelines.