Lokmat Agro >हवामान > गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Latest News Discharge from Gangapur Dam increased, alert issued to citizens by administration | गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Gangapur Dam : गेल्या आठवडाभरापासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे.

Gangapur Dam : गेल्या आठवडाभरापासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Gangapur Dam :  गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक टिकून आहे. आज गंगापूर धरणातून दुपारी २ वाजेपासून ६ हजार १६० क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. 

गेल्या आठवडाभरापासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक टिकून असल्याने रविवारी गंगापूर धरणातून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३,९४४ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीत सुरूच होता. त्यात आज वाढ करण्यात आली असून ६ हजार १६० क्यूसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सूचना करण्यात आली आहे की, सर्व नागरिकांना आणि संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात येते की, गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार दोन दिवसापासून कायम आहे. आज २३ जून रोजी दुपारी २ वाजेपासून ६१६० क्यूसेस करण्यात आला आहे. तसेच धरणातल्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल. 

तसेच पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. तरी गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये, तसेच नदीकाठ लगतच्या आपली  पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी. 

हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता 
गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला २४, आंबोलीत ३२, तर गंगापूरमध्ये ५ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. सायंकाळपर्यंत धरणात ७१ दलघफू पूरपाण्याची आवक झाली. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी पुढील तीन ते चार दिवस हवामान खात्याकडून हलका-मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 

Web Title: Latest News Discharge from Gangapur Dam increased, alert issued to citizens by administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.