Join us

Dam Water Storage : जोरदार पावसाचा परिणाम; 'या' दोन मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:02 IST

Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage)

हिंगोली : पैनगंगा नदीवरील महत्त्वाचे इसापूर धरण सध्या ९४.३८% क्षमतेने भरले असून, १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याची पातळी ४४०.४३ मीटर इतकी झाली आहे. मागील १२ तासांत धरणात तब्बल ६.०९८६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.(Dam Water Storage)

यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ३ दरवाजे ५० सेंटीमीटरने उचलून, सुमारे ४ हजार ९१२ क्युसेक पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. (Dam Water Storage)

धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने साठा वाढतच आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना पूराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.(Dam Water Storage)

येलदरी धरणातूनही विसर्ग सुरू होणार

पूर्णा नदीवरील येलदरी धरणही जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाची पातळी ४६१.१२० मीटर असून, पाणीसाठा ९१.८५% इतका आहे. वरच्या भागातील पावसामुळे व खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे धरण लवकरच १००% क्षमतेला पोहोचण्याची शक्यता आहे.

साठा नियंत्रित ठेवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून, साधारण २०० क्युसेक पाणी एका विद्युतजनित्राद्वारे पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

* नदीपात्रात किंवा काठावर जाणे टाळावे.

* पाणी पातळी वाढल्यास तातडीने सुरक्षित स्थळी हलावे.

* प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam : जायकवाडी साठवण क्षमतेत मोठी घट; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीपाऊसपाणी कपातहिंगोली