Join us

Koyna Dam Water: कोयना धरणात मागील २२ दिवसांत आलं किती टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:02 IST

सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

सातारा : सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. 

कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणात २२ दिवसात १८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही हजेरी लावली.

पण, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे. त्यातच काही दिवस उघडीपही होती. त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार, अशी चिंता लागलेली आहे.

कारण, जुलै महिना मध्यावर आला तरी प्रमुख आणि मोठ्या धरणांत अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे ही धरणे भरण्याविषयीही चिंता लागून राहिलेली आहे. सातारा शहरात पाच दिवस ढगाळ वातावरण होते.

कधीतरी रिमझिम पाऊस व्हायचा. तसेच सूर्यदर्शनही घडत होते. पण, गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीसातारापाऊसमहाबळेश्वर गिरीस्थान