Join us

उजनी धरणात हे केलं तर वाढेल ६ टीएमसी पाणीसाठा अन् शेतकऱ्यांच्या जमिनी होतील कसदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 5:11 PM

उजनीच्या काळ्या सोन्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उजनी धरणातील पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या काळ्या सोन्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. उजनीच्या पोटात गेल्या ४३ वर्षांपासून जमा झालेल्या गाळ व गाळमिश्रित वाळूच्या उपशाचे धोरण राबवावे.

उजनीच्या काळ्या सोन्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उजनी धरणातील पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या काळ्या सोन्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. उजनीच्या पोटात गेल्या ४३ वर्षांपासून जमा झालेल्या गाळ व गाळमिश्रित वाळूच्या उपशाचे धोरण राबवावे.

गाळ उपसून जमिनी कसदार करण्यासाठी ठोस अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. उजनी धरणात सुमारे १४ टीएमसीहून अधिक गाळ व गाळमिश्रित वाळू असून हे प्रमाण धरणाच्या एकूण पाणीसाठ्याच्या १३ टक्क्यांच्या आसपास आहे.

धरणातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढल्यास धरणातील पाण्यात १३ टक्क्यांनी म्हणजे ६ टीएमसीहून अधिक पाणी साठा वाढण्यास मदत होईल. याशिवाय शासनाला वाळू विक्रीतून हजारो कोटींचे उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

मात्र गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे धोरण सरकारी कामकाजाच्या गाळात रुतल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. मात्र, उजनी काठावरील अनेक गावात रात्रीच्या वेळी गौण खनिज चोरीच्या घटना घडत आहे. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे.

काही शासकीय अधिकारी गावगुंडांशी हातमिळवणी करून मालामाल होत आहेत. उजनी धरणाचे बांधकाम १९८० मध्ये पूर्ण झाले. या धरणाचे स्वतःचे पाणलोट क्षेत्र नाही. मात्र जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जमा होते.

या धरणाची प्रकल्प क्षमता ३ हजार ३३० दशलक्ष घनमीटर (११७ टीएमसी) आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ५३ आणि मृत साठ्याचे प्रमाण ६४ टीएमसी आहे. यावर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची छाया आहे. यामुळे उजनी धरणातील गाळ काढण्याचे काम सोपे होणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून भीमा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून आलेल्या माती, दगड, गोटे, रेतीमुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. दर दहा वर्षांनी धरणातील गाळाचा आढावा घेऊन, अतिरिक्त गाळ काढणे अपेक्षित आहे. मात्र यावर ठोस निर्णय झाला नसल्याने लाभक्षेत्रात दुष्काळाची तीव्रता अधिकची जाणवणार आहे.

जमिनी कसदार बनविण्यासाठी गाळाची गरज - धरणग्रस्त शेतकऱ्यांना सध्या दुष्काळी परिस्थितीत पोट खराब जमिनी कसदार बनविण्यासाठी उजनीतील गाळाची गरज आहे.मात्र महसूल विभागाकडून पाणलोट क्षेत्रातील माती उपसा करण्याची परवानगी दिली जात नाही.धरणातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढून शेतकऱ्यांना मोफत गाळ दिला जाणार आहे.मात्र, अद्यापपर्यंत निविदा नसल्याने शेतकऱ्यांना स्वखचर्चाने शेतात गाळ भरणे शक्य होत नसल्याने धरणग्रस्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

टॅग्स :उजनी धरणधरणसोलापूरशेतकरीशेतीपाणीराज्य सरकारसरकारमहसूल विभाग