मुंबई : उत्तर पश्चिमेकडून म्हणजे पाकिस्तानसह लगतच्या देशाकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्र पुन्हा गारठला आहे.
पुढील २४ तास हा गारठा कायम राहणार असून, त्यानंतर मात्र तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गत आठवड्यात मुंबईचा पारा वाढला होता. दक्षिण भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानही ढगाळ होते. दरम्यान मुंबईची हवा प्रदूषित नोंदविण्यात आली होती.
थंडीसोबत पावसाचा मारा◼️ उत्तर भारतात मंगळवारपासून थंडी आणखी वाढणार आहे. शिवाय, एकाच वेळी पश्चिमी विक्षोभाच्या दोन प्रणाली सक्रिय झाल्याने २३ जानेवारीपर्यंत अनेक भागांत पावसाचीही शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.◼️ काश्मीर खोऱ्यात बहुतांश भागांत तापमान अजूनही शून्याखाली आहे. सोनमर्गमध्ये तापमान अजूनही शून्याखाली ८.३ अंशावर आहे. हे येथील सर्वांत कमी तापमान आहे.
सोमवारी अनेक ठिकाणी एकांकी किमान तापमान नोंदविण्यात आले. तीन दिवसांनी तापमानात हलकी वाढ होईल. २३ आणि २४ जानेवारीला तापमान कमी राहील. त्यानंतर तापमान हळूहळू वाढेल. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामानशास्त्र
अधिक वाचा: एकाच कारखान्याच्या दोन वजन काट्यावर वेगवेगळी वजने; उसाच्या वजनात २ टनापर्यंत फरक
Web Summary : Maharashtra is experiencing a cold wave due to winds from Pakistan. The chill will persist for 24 hours before temperatures rise. Northern India faces increased cold and potential rainfall. Kashmir remains below freezing, with slight temperature increases expected later.
Web Summary : पाकिस्तान से आ रही हवाओं के कारण महाराष्ट्र में शीतलहर का अनुभव हो रहा है। तापमान बढ़ने से पहले ठंड 24 घंटे तक बनी रहेगी। उत्तरी भारत में ठंड और बारिश की संभावना है। कश्मीर में तापमान हिमांक से नीचे है, बाद में मामूली वृद्धि की उम्मीद है।