Join us

राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांत अधिक प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:50 IST

avkali paus maharashtra कर्नाटक लगतच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत.

कर्नाटक लगतच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत.

या बदलानुसार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. २१ ते ३१ मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान आणि पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खालीच आहे. तापमान अशाच प्रकारचे राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात पावसाचा अधिक प्रभाव राहील.

२७ हजार हेक्टरला फटका, पंचनामे करण्याचे आदेशअवकाळीमुळे राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीत १३ हजार, नाशिकमध्ये ५,८५० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसशेतकरीशेतीमहाराष्ट्रतापमानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज