Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन ते चार दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:02 IST

heat wave गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे. तुलनेने मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर आहे.

उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तसेच सध्याची स्थिती निवळल्यावर (१९ एप्रिलनंतर) राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी अकोल्यात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे. तुलनेने मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर आहे.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या कमाल तापमानात वाढ होईल. तर १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल.

हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. परिणामी राज्यभरात, विशेषतः विदर्भात कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे.

कुठे, किती कमाल तापमानअकोला - ४३.८वर्धा - ४३.१अमरावती - ४३.२यवतमाळ - ४३.२सोलापूर - ४२.५वाशिम - ४२.६परभणी - ४२.२जळगाव - ४२.१गडचिरोली - ४२मालेगाव - ४२बुलडाणा -४१.५जेऊर - ४१.५नागपूर - ४१.४छ. संभाजीनगर - ४१.२बीड - ४०.७गोंदिया - ४०.५धाराशिव - ४०.३सातारा - ४०.३सांगली - ३८.८नाशिक - ३८.५कोल्हापूर - ३७.१मुंबई - ३२.८

अधिक वाचा: यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Alert for Maharashtra; Check Temperature in Your District

Web Summary : Maharashtra faces a heatwave from April 15th, with temperatures soaring, especially in Vidarbha. Akola recorded the highest at 43.8°C. Some areas may experience rain after April 19th. Northern India's high-pressure area is influencing the weather.
टॅग्स :हवामान अंदाजतापमानमहाराष्ट्रमुंबईपाऊसविदर्भअकोला