Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > उत्तर भारतात हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी; 'या' तारखेपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता

उत्तर भारतात हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी; 'या' तारखेपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता

First snowfall of winter in North India; Cold likely to increase again from 'this' date | उत्तर भारतात हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी; 'या' तारखेपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता

उत्तर भारतात हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी; 'या' तारखेपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता

हिमाचल प्रदेशात शुक्रवारी या हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी झाली. यामुळे गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून असलेला कोरडा काळ संपुष्टात आला असून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अनेक पर्यटकांनी या नयनरम्य हिमवृष्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून, हिमाचलला हिवाळ्यातील नंदनवन (विंटर वंडरलैंड) अशी उपमा दिली आहे.

प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटक बर्फाचा आनंद घेताना दिसत आहेत. 'एक्स' वर काही युजरनी ताज्या हिमवृष्टीचे व्हिडिओ पोस्ट करत पर्यटकांना रस्त्यावरून सावकाश गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे.

वातावरणात सुधारणा झाल्याने पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी उणे २.८ अंशांवर पारा होता. दिवसभरात कमाल तापमान २९ अंशांपर्यंत, तर किमान तापमान १४ अंशांदरम्यान होते.

सोमवारी (दि. २६) पुन्हा काही अंशी थंडी वाढण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशावर घड्याळ काटा दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वारा स्थिती आहे. त्याच्या शेवटच्या परिघात, बंगालच्या उपसागरातून ताशी २५-२७ किलोमीटर येणाऱ्या वेगवान आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे थंडीचा चढ-उतार जाणवत आहे.

अधिक वाचा: आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार

Web Title : उत्तर भारत में पहली बर्फबारी; ठंड बढ़ने की संभावना

Web Summary : हिमाचल प्रदेश में पहली बर्फबारी हुई, जिससे सूखा समाप्त हुआ। पर्यटक नज़ारों का आनंद ले रहे हैं। सोमवार से ठंड बढ़ने की संभावना है। चक्रवाती हवाओं से तापमान में उतार-चढ़ाव हो रहा है।

Web Title : First Snowfall in North India; Cold Weather Expected to Increase

Web Summary : Himachal Pradesh experienced its first snowfall, ending a dry spell. Tourists are enjoying the scenic beauty. A slight increase in cold is expected from Monday. Cyclonic winds are causing temperature fluctuations.