तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. अनेकदा कामानिमित्त घराबाहेर पडले की दहा मिनिटांत पूर्ण कातडी भाजून निघाती इतका कडक उन्हाळा एप्रिल-मे मध्ये पाहायला मिळतो.
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे चेहरा पूर्णपणे सनबर्न होतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहऱ्याची काळजी गरजेचे आहे. प्रखर उन्हामध्ये अतिनील किरणांचे प्रमाण (यूव्ही इन्डेक्स) हे जास्त असते.
अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यास त्वचेसंबंधी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. 'सनबर्न' पासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लावणे, अंगभर झाकलेले कपडे घालणे आणि सावलीत राहणे या दक्षता घ्याव्यात.
दर्जेदार सनस्क्रीन, सुती कपडे वापरा
उन्हाळ्यात चेहऱ्याला किंवा हाताला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सनस्क्रीन हा चांगला उपाय आहे; मात्र हे लावण्यास मर्यादा आहेत. सुती कपडे वापरल्यामुळे उन्हाचा त्रास कमी हातो.
उन्हाळ्यात सनबर्नचा त्रास टाळायचा असेल तर तोंडाला मास्क, डोक्याला टोपी घालूनच बाहेर पडा. सनस्क्रीन लावू शकता; मात्र घराबाहेर पडण्याआधी ते अर्धा तास लावावे लागते. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत. - डॉ. डी. आर. नलवडे, त्वचारोगतज्ज्ञ, कोल्हापूर.
१५ मिनिटांच्या उन्हात सनबर्नचा धोका
• अगदी १५ मिनिटे जरी उन्हात गेला तरी सनबर्नचा धोका उद्भवतो. चेहऱ्यावर डाग पडण्याबरोबरच कातडीही काळी पडते.
• त्यामुळे सनबर्नचा धोका टाळण्यासाठी मास्क लावणे, टोपी घालणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात 'हे' करा
उन्हाळ्यात फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप उपायकारक आहे. काकडी, कलिंगड यासह विविध लिंबूवर्गीय फळे शरीराला आल्हाददायी ठेवतात. या दिवसांमध्ये शाकाहारी जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी