Join us

निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग वाढला; तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:30 IST

निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री १० वाजता चार वक्रद्वारे १० सेंटिमीटरने दरवाजे उघडण्यात आले आणि १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला. मात्र परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १०.४५ वाजता देखील प्रकल्पाचे १० दरवाजे प्रत्येकी २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. 

बालाजी बिराजदार

धाराशिव जिल्ह्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री १० वाजता चार वक्रद्वारे १० सेंटिमीटरने दरवाजे उघडण्यात आले आणि १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला.

मात्र परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १०.४५ वाजता देखील प्रकल्पाचे १० दरवाजे प्रत्येकी २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. आता एकूण ७६३६ क्यूसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे अशी माहिती शाखा अभियंता एस. बी. गंभीरे यांनी दिली.

धरण परिसरात पावसामुळे आवक वाढ

• याआधी १६ ऑगस्ट रोजी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर १८ ऑगस्टला ६ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडून ५७.८६१ घ.मी./से. इतका विसर्ग सोडण्यात आला होता. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा १० दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले, तेव्हा ३८१६ क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

• शनिवारी १३ सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील तेरसह परिसरात भारी पावसाची नोंद झाली. परिणामी, तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री १० वाजता २ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले, आणि काही तासांतच एकूण ४ वक्रद्वारे १५३० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. तो रात्रभर सुरूच होता.

नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका

पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने तेरणा नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी, पशुपालक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

टॅग्स :धाराशिवपाणीधरणनदीमराठवाडाशेती क्षेत्र