Lokmat Agro >हवामान > रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती?

रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती?

Cyclone Remal is likely to hit today, what is the situation in Vidarbha Marathwada till May 30? | रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती?

रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती?

राज्यात यंदा वेळेआधीच दाखल होणार का मान्सून ?

राज्यात यंदा वेळेआधीच दाखल होणार का मान्सून ?

शेअर :

Join us
Join usNext

मान्सून प्रगतिपथावर असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सूनने हिश्शाने काबीज केले आहेत. मान्सूनचे आगमन ३१ मेदरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात ३० मेपर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाटसदृश स्थिती कायम राहील.

मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते. जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर हे सर्व अवलंबून आहे- बहुतांश भागांत अवकाळीच्या स्थितीबरोबरच १ जूनपर्यंत उष्णतासदृश स्थिती कायम राहील.

रेमल' चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता

महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दुसरीकडे बंगाल उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरूपातील 'रेमल' नावाचे चक्रीवादळ २६ मे रोजी मध्यरात्री ताशी १३० ते १३५ किमी वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

Web Title: Cyclone Remal is likely to hit today, what is the situation in Vidarbha Marathwada till May 30?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.