मुंबई : दक्षिण भारतात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरले तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेल्या ढगांमुळे हवेतील ओलावा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामानातील या बदलामुळे मंगळवार व बुधवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह दक्षिण कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी वर्तवली आहे.
मुंबईचे किमान तापमान सोमवारी १७ अंश सेल्सिअस नोंदविले तरी हवामानातील बदलामुळे थंडी मात्र कमी होणार आहे.
मुंबई प्रादेशिक मौसम विभागाच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने तयार झालेल्या फळांची व भाजीपाल्याची काढणी करावी.
अधिक वाचा: उमेद अभियानातील महिलांना मिळणार आता नवीन ओळख; पदनामात होणार 'हे' मोठे बदल
