lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chance of rain with lightning in 6 districts of Marathwada | मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Today's Rain Alert: मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

Today's Rain Alert: मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात काही भागात पावसाची तर काही भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. आज दिनांक १९ मे राेजी पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील.

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दि १६ मे रोजी धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार असून दि १९ मे ते २२ मे पर्यंत पावसाला पोषक वातावरण राहणार आहे. दि २१ मे रोजी धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर दि २१ व २२ मे रोजी मे रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Chance of rain with lightning in 6 districts of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.