Join us

विदर्भ-खान्देशात अजून तीन दिवस पावसाची शक्यता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:30 IST

मराठवाडा आणि उर्वरित राज्यात काय आहे अंदाज?

विदर्भ खान्देशात आणखी तीन दिवस पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे सेवानिवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

काय आहे अंदाज?

  • संपूर्ण विदर्भातील ११ व खानदेशातील नंदुरबार धुळे जळगांव अशा ३ जिल्ह्यासहित एकूण १४ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अजुन ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. १ डिसेंबर पर्यन्त कायम जाणवते. 
  • मुंबईसह कोकण व मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील (७+८+७=) २२ जिल्ह्यात मात्र शुक्रवार दि.१ डिसेंबर पर्यन्त ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे. 
  • दरम्याच्या काळात गारपीटीची शक्यता मात्र महाराष्ट्रात कुठेच जाणवत नाही. 

तापमानात होणार घटसिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर असे ७ जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ डिग्रीने कमालीची घसरण जाणवत असुन तेथे दिवसाही चांगलाच गारवा जाणवू शकतो. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात हा परिणाम अधिक जाणवेल. शनिवार दि.२ डिसेंबर पासून वातावरण पूर्णपणे निवळेल.

माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ , भारतीय हवामान खाते, पुणे.

टॅग्स :हवामानपाऊसविदर्भमराठवाडा