Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of heavy rain at selected places over Ghats including Konkan | कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दि. ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.

दि. ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.

राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आज दिनांक ३१ जुलै २३ ते पुढील पाच दिवस अनेक मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा येथील घाटमाध्याच्या परिसरात निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.

दिनांक १ आणि २ ऑगस्ट रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.  ३ व ४ ऑगस्ट रोजी या परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्याचे पाऊसमान

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक ३१ जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर १ ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक  १ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक ३ ऑगस्ट २३  पर्यंत पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक ४ ते १० ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

पेरणीसाठी सल्ला 

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक २ ते ८ ऑगस्ट २३ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Chance of heavy rain at selected places over Ghats including Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.