lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > सावधान.. राज्यात अनेक ठिकाणी दोन अंशांनी वाढू शकते तापमान

सावधान.. राज्यात अनेक ठिकाणी दोन अंशांनी वाढू शकते तापमान

Caution.. The temperature may increase by two degrees in many places in the state | सावधान.. राज्यात अनेक ठिकाणी दोन अंशांनी वाढू शकते तापमान

सावधान.. राज्यात अनेक ठिकाणी दोन अंशांनी वाढू शकते तापमान

राज्यात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा व बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणात १ ते २ अंशाने वाढू शकते.

राज्यात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा व बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणात १ ते २ अंशाने वाढू शकते.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा व बहुतेक जिल्ह्याचे तापमानप्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणात १ ते २ अंशाने वाढू शकते, असा इशारा सेंटर फॉर सायन्स, टेक्नालेंजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेने दिला आहे.

हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही, तर ३ अंशांनी वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे.

२०३० पर्यंत होणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाची आकडेवारी व कॉर्डेक्स (कोऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) मॉडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सर्वांत कमी तापमानाचे जिल्हे
गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाच रेकॉर्ड तोडत आहेत. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. - प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

Web Title: Caution.. The temperature may increase by two degrees in many places in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.