Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?

ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?

As October heat drags on, mercury plunges in state; What temperature where? | ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?

ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?

राज्यातील १० शहरांमध्ये दोन ते पाच अंशांनी घट

राज्यातील १० शहरांमध्ये दोन ते पाच अंशांनी घट

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके कमी होण्यास सुरुवात झाली असून, राज्यभरातील १० शहरांच्या किमान तापमानात दोन ते पाच डिग्रीने घट नोंदविली गेली आहे. नाशिकपासून सोलापूरपर्यंतच्या १० जिल्ह्यांचा यात समावेश असतानाच मुंबईत मात्र अद्यापही म्हणावा तसा पारा खाली उतरलेला नाही. त्यामुळे प्रदूषणासोबतच मुंबईकरांना बसत असलेले उन्हाचे चटके कायम आहेत.

महाराष्ट्रात २५ ऑक्टोबरनंतर अपेक्षित असलेल्या ऑक्टोबर हीटचा उतरतीकडे कल जाणवू लागला आहे. पहाटेच्या गारव्यात कमालीची वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा कमी आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिकपासून सोलापूरपर्यंतच्या १० जिल्ह्यांत दोन ते पाच डिग्रीने कमी झाले आहे, कमाल तापमानही मात्र सध्या सरासरीइतकेच आहे.

कमाल आणि किमान तापमान

शहर / कमाल / किमान

अलिबाग / ३४.१ / २०.५

छत्रपती संभाजीनगर / ३३.२ / १५

बीड / ३१.७ / १६.५ 

जळगाव / ३५.२ / ११

महाबळेश्वर / २६.१ / १६.२ मुंबई / ३६.५ / २२.४ -

 नांदेड / ३३.२ / १८ नाशिक / ३२.१ / १५.३

 परभणी / ३४.१ / १६.१ सोलापूर / ३६.१ / १७

Web Title: As October heat drags on, mercury plunges in state; What temperature where?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.