Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील 'या' जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी

दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील 'या' जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी

After a long wait, a yellow rain alert has been issued for this district of the state | दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील 'या' जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी

दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील 'या' जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी

Rain Update मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसल्यानंतर जून महिन्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती.

Rain Update मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसल्यानंतर जून महिन्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती.

मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसल्यानंतर जून महिन्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती.

मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, ८ जूनपर्यंत भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्रीच्या वेळी उकाड्यात वाढ झाली असून, यामुळे पावसासाठी पोषण तयार होताना दिसत आहे. यंदा मे महिन्यात जिल्ह्यात २२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दमदार पाऊस झाला. उत्तर नगर जिल्ह्यात या पावसाचे प्रमाण कमी आहे.

दरम्यान मान्सूनचा वेग कमी झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील पावसात खंड दिसत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात केवळ ६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या पावसाचे पुन्हा जिल्ह्यात आगमन होण्याचे चित्र असून, भारतीय हवामान विभागाने ८ जूनपर्यंत जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या स्वरूपात पाऊस झाला.

अधिक वाचा: पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Web Title: After a long wait, a yellow rain alert has been issued for this district of the state