lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

7.5 thousand hectares of agriculture in the state were damaged due to bad weather, how much in which district? | राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला 

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला 

शेअर :

Join us
Join usNext

सलग सहाव्या दिवशी शनिवारी ही अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले. विदर्भात मंगळवार ते गुरुवारी या तीन दिवसात तब्बल साडेसात हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. 

सर्वाधिक 4000 हेक्टर वरील पिकांचे नुकसान एकटा जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. रविवारी ही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

राज्यात नऊ एप्रिल पासून अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार ाज्यात 7489 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी पहाटे ही मराठवाडा विदर्भासह जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला. 

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? 

जळगाव 3984 हेक्टर 
बीड 1020 हेक्टर 
नांदेड 748 हेक्टर 
वर्धा 527 हेक्टर 
धाराशिव ३०८ हेक्टर 
हिंगोली 297 हेक्टर 
छत्रपती संभाजीनगर 163 हेक्टर 
लातूर 160.2 हेक्टर 
जालना 133.3 हेक्टर 

सात राज्यात गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा 

  • हवामान विभागाने जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान व मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील 13 जिल्ह्यात येत्या काही तासात गारपीटीची शक्यता आहे. 
  • स्कायमेट या हवामान संस्थेने मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. 
  • तसेच उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा वंदमान निकोबार मध्ये पावसाची तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल मध्ये हलक्या बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. 
  • इराण आणि पाकिस्तानमार्गे उत्तर भारतात पोचणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान बदलल्याने 15 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे.

Web Title: 7.5 thousand hectares of agriculture in the state were damaged due to bad weather, how much in which district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.