राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. सर्वाधिक १६४ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पाऊस झाला होता.
ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसामुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. चारही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता संभाजीनगर विभागात १३९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा १०४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात पाऊस चार टक्के अधिक झाला आहे. जूनमध्ये २०७मिलिमीटर (९९.८ टक्के), जुलै २९०.८ मिलिमीटर (८७.९ टक्के), ऑगस्टमध्ये २९८.२ मिलिमीटर (१०४.३ टक्के), तर सप्टेंबरमध्ये २९५.३ मिलिमीटर (१६४.३ टक्के) पावसाची नोंद झाली.
१८० सप्टेंबरमध्ये सरासरी मिलिमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात यंदा २९५ मिलिमीटर अर्थात १६४.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्याचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे.
सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर विभागात
नाशिक - ९८ मिमी अमरावती - ११५ मिमी नागपूर - ११० मिमी छत्रपती संभाजीनगर - ९४७.५ मिमी पुणे - ८७%कोकण - ९६ मिमी
बीड, धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्के
जिल्हानिहाय विचार करता बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्के पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी ७१ टक्के पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.
चार महिन्यांतील पावसाची मिमीमध्ये आकडेवारी
महिना | सरासरी | प्रत्यक्ष | टक्के | गतवर्षी टक्के |
जून | २०८ | २०७ | ९९.८ | १०७ |
जुलै | ३३१ | २९०.८ | ८७.९ | १४६ |
ऑगस्ट | २८६ | २९८.२ | १०४.३ | ९१ |
सप्टेंबर | १८० | २९५ | १६४.३ | ११६ |
Web Summary : Maharashtra received 108% of its average rainfall this monsoon. September saw 164% more rain. Aurangabad division recorded the highest at 139%. Excess rain damaged crops across 60 lakh hectares. Beed and Dharashiv districts received 161% of average rainfall.
Web Summary : महाराष्ट्र में इस मानसून में औसत से 108% बारिश हुई। सितंबर में 164% अधिक वर्षा हुई। संभाजीनगर विभाग में सबसे अधिक 139% बारिश दर्ज की गई। अत्यधिक बारिश से 60 लाख हेक्टेयर में फसलें क्षतिग्रस्त हुईं। बीड और धाराशिव जिलों में औसत से 161% बारिश हुई।