अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या आणि मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे २ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० पासून ५५ सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून आता ११५१.५१ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
सध्या अप्पर वर्धा धरणात २१० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा होत आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाण्याच्या साठ्याची टक्केवारी २६.२७ एवढी होती.
अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मीटर एवढी ठेवण्यात आली असून, सध्या ही पातळी ३४२.२७मीटर झाली आहे. त्यामुळे जवळपास ९६.२७ टक्के धरण भरले आहे.
२८ ऑगस्टपासून उघडली दारे
धरणाची सात दारे २८ ऑगस्ट रोजी ३० सेंटीमीटरने उघडण्यात आली होती. २९ ऑगस्ट रोजी नऊ दारे ४० सेंटिमीटरने उघडण्यात आली. आता पुन्हा अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.
बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडले
धामणगाव रेल्वे तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवार पूर्णतः जलमय झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील वरूड बगाजी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आली असून, ६६६.२७५ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा वर्धा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.
अमरावती व वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वरूड बगाजी येथील बगाजी सागर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. मागील महिनाभरात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नव्हती.
३० सेमीने उघडली दारे
धरणात ७० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सततच्या पावसाने पाणीपातळीत वाढ होत असल्याने मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजता धरणाची २५ दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र