Join us

सिद्धेश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात १३ हजार क्युसेक पाण्याचा होतोय विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:29 IST

Siddheshwar Dam Water Update : जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण शंभर टक्के भरले आहे.

जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण शंभर टक्के भरले आहे.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी सकाळी १०:०० वाजता धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून, १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सिद्धेश्वर धरण रविवारी तुडुंब भरले.

१७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता धरणाचे १४ पैकी ४ वक्रद्वार २ फूट ८ वक्रद्वार १ फूट, असे एकूण १२ वक्रद्वार उघडण्यात आले आहेत.

सिद्धेश्वर धरणाचा जलसाठा वाढला

• सद्यस्थितीत सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून, जलाशयात पाण्याचा ओघदेखील निरंतर चालू आहे.

• सिद्धेश्वर धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून १५ ऑगस्टपासून विद्युत निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मितीद्वारे २ हजार ७०० क्युसेक पाण्याचा प्रवाह नदीपात्राद्वारे सिद्धेश्वर धरणात सोडण्यात येत आहे.

• रविवारी येलदरी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे १७ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

हेही वाचा : मराठवाड्यातील ६० टक्के शेतकऱ्यांची यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे पाठ

टॅग्स :पाणीशेती क्षेत्रमराठवाडाधरणनदीहिंगोली