जायकवाडी धरणाचे गुरुवारपासून उघडण्यात आलेल्या १८ पैकी १० दरवाजे रविवारी बंद करण्यात आले आहे. आता आठ दरवाजे अर्धा फूट उघडलेले असून त्यातून चार हजार १९२ क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे.
सध्या ऊर्ध्व धरणांतून नाथसागरात १५ हजार क्युसेक आवक सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
गुरुवारी (दि.२१) प्रथम जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटांनी उघडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी आवक वाढल्याने या दरवाजांची उंची वाढवून अडीच फूट करण्यात आली होती.
त्यातून ४७ हजार १६० क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत होते; परंतु शनिवारपासून जायकवाडीत होणारी आवक घटत आहे. रविवारी आवक १५ हजार ९०५ क्युसेकवर आल्याने आठ दरवाजे अर्धा फुटांनी उघडे असून त्यातून ४ हजार १९२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.