lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

young farmer sandesh and aadesh cultivation of capsicum crop on barren land | संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्यानंतर ४५ व्या दिवशीच पहिला तोडा सुरू झाला.

पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्यानंतर ४५ व्या दिवशीच पहिला तोडा सुरू झाला.

शेअर :

Join us
Join usNext

सतीश सांगळे
कडबनवाडी ता. इंदापूर येथे दीड एकर खडकाळ माळरानावर क्षेत्रात सात महिन्यात चक्क ५० टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन निव्वळ नफा १२ लाख रुपये कमावून प्रयोगशील शेतकरी शिंगाडे बंधुनी किमया साधली आहे. आपल्या जीवाचे रान करून जणू 'मातीतलं सोनं' त्यांनी शोधून काढले आहे.

पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्यानंतर ४५ व्या दिवशीच पहिला तोडा सुरू झाला. पाहिले काही तोडे दर सात-आठ दिवसांनी येत होते. मात्र उत्पादनात उच्चांकी होते.

अधिक वाचा: एसआरटी पद्धतीने कारल्याची लागवड करतेय उत्पादन खर्चात बचत

चाळीस, पन्नास आणि पुढे उच्चांकी ६५ रुपयेपर्यंत किलोला दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले सरासरी आठ महिने ३५रु, किमान दर मिळाला आहे बारामती, फलटण व पुणे येथील बाजारात दररोज विक्री होते. आतापर्यंत ४० टन उत्पादन मिळाले असुन सरासरी ५० टन उत्पादन अपेक्षित आहे लागवड व इतर सुमारे ४ लाख रुपये खर्च आला असून खर्च वजाजाता दीड एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीमधुन १२ लाख रुपये नफा झाला आहे असे त्यांनी सांगितले ढोबळी मिरचीला विविध टप्प्यावर आणि विविध गरजेनुसार स्प्रे, बुरशीनाशक फुगवणीसाठी साईज अशी विविध उत्पादने वापरली असून ती अत्यंत गुणकारी ठरली आहेत.

Web Title: young farmer sandesh and aadesh cultivation of capsicum crop on barren land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.