lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

Wow! Strawberry farm flourished by college boys in the heart of Pune shivajinagar | व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

व्वा रे पठ्ठे! पुण्याच्या मध्यभागी कॉलेजच्या पोरांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

पुण्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे.

पुण्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : स्ट्रॉबेरी म्हटलं की, त्याची लागवड फक्त महाबळेश्वर परिसरात होते असा समज आहे, परंतु पुण्याच्या वातावरणात सुद्धा स्ट्रॉबेरी पिकाची लागवड शक्य आहे हे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. स्ट्रॉबेरी हे पीक संवेदनशील असून योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतली तर निश्चितच उत्पादन शक्य आहे. फक्त त्यासाठी लागवडीचा योग्य कालावधी महत्त्वाचा आहे असे निदर्शनास आले आहे.

कृषि महाविद्यालय पुणे येथील कृषी पदवीधरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अवलंब करण्यासाठी कृषि आधारित अनुभवातून शिक्षण प्रणाली राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषि पदवी आणि उद्यानविद्या पदवी विद्यार्थ्यांनी कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकांची यशस्वी लागवड करून चांगले उत्पादन काढले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रेरणेतून सातत्याने नवीन प्रयोग सुरू असतात. अनुभव आधारित शिक्षणाचा भाग म्हणून २० गुंठे प्रक्षेत्रावर दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी स्ट्रॉबेरीच्या स्वीट सेन्सेशन, ब्रिलीयंन्स, एलिना, विंटर डॉन आणि ब्युटी अशा पाच जातींची लागवड करण्यात आली होती. लागवडीपासून ते काढणी आणि विक्री व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली आहेत. 

सर्वसाधारणपणे ७५ ते ८० दिवसांनी स्ट्रॉबेरीची काढणी सुरू होते आणि दीड ते दोन महिन्यापर्यंत काढणी सुरू राहते. जानेवारी महिन्यापासून या स्ट्रॉबेरीची काढणी सुरू झाली आहे. प्रति झाड सरासरी ३५० ते ४५० ग्रॅम एवढे उत्पन्न मिळत असून प्रत्येक झाडाला जवळपास ११ ते १७ फळे लागली आहेत. फळांचे सरासरी वजन २५ ते ३० ग्रॅम इतके आहे. एका फळाचे ८१ ग्रॅम इतके सर्वात जास्त वजन स्वीट सेन्सेशन या जातीचे दिसून आले आहे. दररोज जवळपास ४० ते ५० किलो स्ट्रॉबेरीची काढणी केली जाते, त्यातून महाविद्यालयास बारा ते पंधरा हजार रुपये दररोज मिळतात.

कृषी महाविद्यालय पुणे येथे घेण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असून कृषि महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्यानविद्या विभागातील प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांचे देखरेखी खाली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड आणि उत्पादन घेणे शक्य झाले आहे. फळाची गुणवत्ता आणि गोडी या दृष्टिकोनातून स्वीट सेन्सेशन या जातीच्या स्ट्रॉबेरीची मागणी जास्त वाढत आहे.

Web Title: Wow! Strawberry farm flourished by college boys in the heart of Pune shivajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.