Lokmat Agro >लै भारी > अख्खं गाव करतंय 'सोलार'वर शेती

अख्खं गाव करतंय 'सोलार'वर शेती

The whole village is doing agriculture on 'Solar' Pumps | अख्खं गाव करतंय 'सोलार'वर शेती

अख्खं गाव करतंय 'सोलार'वर शेती

पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत.

पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूर : पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाहिजे तेवढे पंप बसविण्यासाठी यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक सोलार पंपावर शेती फुलवणारे गाव अशी बेंबळेची ओळख झाली आहे.

राज्यात अगोदर २४ तास शेतीलावीजपुरवठा होत असे. विजेचा तुटवडा झाल्यानंतर भारनियमनाचा शब्द परवलीचा झाला. नव्याने शेतीला कनेक्शन मिळणे कठीण झाले व पुरेशा दाबाने ८ तास मिळणे कठीण झाले. वीज कनेक्शन असल्याने व गावातच सबस्टेशन असल्याने बेंबळे गावातील शेतकऱ्यांनी शेती बागायती करण्यावर भर दिला.

कार्यान्वित पंप
- २०१६ मध्ये स्वाती जयवंत भोसले, रेखा हनुमंत भोसले, उषा भजनदास जगताप, मनीषा मोहन भोसले व उर्मिला विलास भोसले या महिलांच्या शेतात साडेसात एच. पी. चे सोलार पंप कार्यान्वित झाले.
- सध्या साडेसात एच. पी. चे ११, ५ एच.पी.चे २६० व तीन एच. पी. चे १५५ शेतीपंप आहेत.

बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत
-
माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळेना झाल्याने शेतीसाठी सोलार पंप बसविण्याची कल्पना पुढे आली. सोलार पंप बसविण्यासाठी जयवंत भोसले अग्रेसर होते. अजित जैन यासाठी सहकार्य करण्यास तयार होते. मात्र, सोलारवर मोटारी चालतील यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेना. जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटले.
डॉ. भोसले यांनीही बेंबळे गावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन १०० सोलार पंप बसविण्यास परवानगी दिली. मात्र शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे येत नव्हते. कशाबशा ५ महिला शेतकरी तयार झाल्या व शेतकरी हिस्सा भरून सोलार पंपावर बागायती शेती सुरू झाली. २०१६ मध्ये सोलार पंपावर ५ महिलांची बागायत शेती यशस्वी झाल्याने आज गावात साधारण सव्वाचारशे सोलार पंप झाले आहेत. याशिवाय १७५ शेतकऱ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना सोलारवर शेती करायची आहे. मात्र, मंजुरीसाठी अडचणी येतात. गावातील संपूर्ण २६०० हेक्टर क्षेत्रात प्रामुख्याने ऊस, केळी, द्राक्ष, पेरू, डाळिंब व इतर पिके आहेत. गावात दररोज ६ हजार लिटर दूध संकलन होते. पेंडिंग अर्ज मंजूर झाले तर पुढील वर्षात सोलार पंपाची संख्या ६०० होईल. विजेची कटकट कमी झाली व दिवसभर शेतीला पाणी देता येते. - जयवंत भोसले, कृषिनिष्ठ शेतकरी, बेंबळे, माढा

Web Title: The whole village is doing agriculture on 'Solar' Pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.