Join us

बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचं केलं सोनं, 'गोकुळ'चा अफलातून प्रयोग; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:08 IST

बायोगॅस युनिटमधून शेतकऱ्यांना गॅस मिळते, साधारणतः महिन्याला दीड सिलिंडर गॅसची निर्मिती होते. त्याचबरोबर स्लरीही बाहेर पडते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त आहे. पण, स्लरी संबंधित शेतकऱ्याला नको असेल, तर ते 'गोकुळ'कडून त्याची खरेदी केली जात आहे.

राजाराम लोंढेशेतकऱ्यांच्या बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरी (द्रव्यरूप शेणखत) पासून Gokul Milk गोकुळदूध संघाने सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुरु केला आहे.

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. आतापर्यंत 'मायक्रो न्यूट्रीयंट', 'ग्रोमॅक्स', 'फॉस्फ-प्रो' या सेंद्रिय खतांची सोळा लाखांची विक्रीही संघाने केली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून गेल्या दोन वर्षात तब्बल ४ लाख लिटर स्लरी (द्रव्यरूप शेणखत) खरेदी केली आहे.

शेतकऱ्यांच्या बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या या स्लरीपासून संघाने सेंद्रीय खतांची निर्मिती केली आहे. 'मायक्रो न्यूट्रीयंट', 'ग्रोमॅक्स', 'फॉस्फ-प्रो' या सेंद्रीय खतांची सोळा लाखांची विक्रीही केली आहे.

एन. डी. डी. बी, सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन व 'गोकुळ' यांच्या वतीने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानावर बायोगॅस युनिट दिले आहेत.

या युनिटमधून शेतकऱ्यांना गॅस मिळते, साधारणतः महिन्याला दीड सिलिंडर गॅसची निर्मिती होते. त्याचबरोबर स्लरीही बाहेर पडते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त आहे. पण, स्लरी संबंधित शेतकऱ्याला नको असेल, तर ते 'गोकुळ'कडून त्याची खरेदी केली जात आहे.

गेल्या दोन वर्षात १२० बायोगॅस युनिटमधून पावणेचार लाख लिटर स्लरी खरेदी केली आहे. या स्लरीपासून गडमुडशिंगी खत कारखाना येथे प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीही केली जात आहे.

शेतकऱ्यांकडून दोन रुपये लिटरने स्लरीबायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरी शेतीसाठी उपयुक्त असते. त्याचा वापर बहुतांशी शेतकरी करतात. मात्र, जे अल्पभूधारक दूथ उत्पादक आहेत, त्यांच्याकडून 'गोकुळ' हे स्लरी खरेदी करते. गुणवत्तेनुसार २५ पैशांपासून दोन रुपयांपर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. स्लरी खरेदी करताना त्यातील 'पीएच'चे प्रमाण व ते शेण किती कुजले आहे, हे पाहूनच त्याचा दर निश्चित केला जातो.

स्लरी ते सेंद्रिय खताची निर्मितीएनडीडीबीने स्लरी संकलन करण्यासाठी टँकर दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना स्लरी विकायची आहे, त्यांच्याकडे जाऊन पहिल्यांदा स्लरीची गुणवत्ता तपासली जाते. त्यानंतर पंपाने ओढून ते टँकरमध्ये भरले जाते. गोळा केलेली स्लरी प्रक्रिया प्रकल्पात आणली जाते. त्यातील पाणी कमी करून ते वाळवले जाते. त्यावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते.

अन्न औषध प्रशासनाची अडचणदोन वर्षांमध्ये संघाने प्रथमतः ही सर्व सेंद्रिय खते संघाच्या पशुवैद्यकीय सेंटर, चिलिंग सेंटर येथे उपलब्ध केली. त्याला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, अन्न व औषधप्रशासनाचे नियम व अटी फार कडक असून, यासाठी विक्री परवाना असणे गरजेचे आहे. ते परवाना काढण्याची प्रक्रिया सुरु असून, त्यानंतर उत्पादने खुल्या बाजारात माफक दरात उपलब्ध होतील.

७००० बायोगॅस आतापर्यंत जिल्ह्यात१) एन. डी. डी. बी, सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशन शेतकऱ्यांना अनुदानावर हे आधुनिक युनिट देते. विशेष म्हणजे संबंधित कंपनीची यंत्रणा शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन ते बसवून देते. तेथून पुढे दहा वर्षे त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही संबधित कंपनीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.२) स्वयंपाकासाठी मुबलक गॅस मिळतो, त्याचबरोबर शेतीसाठी चांगल्या दर्जाचे खत मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल सात हजार शेतकऱ्यांनी हे युनिट बसवले आहेत.

या गावातून केली जाते स्लरी खरेदीकरवीर : चुये, कावणे, वडकशिवाले, निगवे खालसा, येवती, इस्पुर्ती.कागल : बाचणी.

अशी केली 'गोकुळ'ने स्लरी खरेदी२०२२-२३ या आर्थिक वर्षांत : ३ लाख ५० हजार लिटर२०२३-२४ या आर्थिक वर्षात : ५० हजार लिटर

सेंद्रिय खतांचे उत्पादन सेंद्रीय खत : उत्पादनफॉस्फ-प्रो : ७०० बॅगग्रोमॅक्स : ३ हजार लिटरमायक्रो न्यूट्रीयंट (MRL) : ५०० बाटलीरुटगार्ड : २५०० लिटरगार्डन कीट : २५०० कीट

शेतकऱ्यांना बळकटी देण्याची भूमिका : डोंगळे'गोकुळ'ने शेतकऱ्याला अत्याधुनिक सुविधा देऊन अधिक भक्कम करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनुदानावर उत्पादकांना बायोगॅस युनिट दिली आहेत. त्यातून मिळणारी स्लरी शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. स्लरी विकत घेवून दर्जेदार सेंद्रीय खत तयार करून ते शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

टॅग्स :सेंद्रिय खतखतेसेंद्रिय शेतीकोल्हापूरशेतकरीदुग्धव्यवसायदूधगोकुळ