Join us

उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 2:12 PM

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते

सत्यजित रणवरेइंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते.

काकडीचे पीक खरीप हंगामात आणि प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाते. काकडीचा गर थंड असतो आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे काकडीला उन्हाळ्यामध्ये चांगली मागणी असते. परिणामी दरही चांगला मिळतो.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडीची लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलै महिन्यांत केली जाते.

उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात असलेली मागणी बाजारात काकडीचे असलेले कमी प्रमाणातील उत्पादन व यामुळे मिळत असलेला चांगला बाजारभाव यांमुळेच रणवरे यांनी उन्हाळ्यात पीक निघेल याचे नियोजन करून चाळीस दिवसांच्या काकडीची जानेवारी महिन्यात लागवड केली होती.

काकडीचे पीक हे पाणीदार असल्याने उन्हाळ्यामध्ये काकडीला मोठी मागणी असते. घरगुती तसेच हॉटेल व्यवसायातही काकडीला मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी काकडीची लागवड केली, काकडी कमी कालावधीतील पिक असून ४० दिवसांमध्ये काकडी पिकाचे उत्पादन सुरू होते.

नंदकुमार रणवरे यांनी १८ जानेवारीला आपल्या एक एकर क्षेत्रात अर्धा एकर पांढरी काकडी, तर अर्ध्या एकर क्षेत्रात हिरवी काकडी लावली आहे. काकडीचा पहिला तोडा ४१ व्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे. काकडी पिकाचे ४० दिवसांमध्ये साधारण २० तोडं होतात.

सध्या एका तोड्यात साधारण ५०० ते ६०० किलो काकडी निघते व ही काकडी पुणे व बारामती मार्केटला जात असून सर्वसाधारणपणे १६ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंतचा दर प्रतिकिलोला मिळत असल्याचे रणवरे यांनी सांगितले. काकडी पीक कमी कालावधीत जास्त फायदा मिळवून देणारे असले तरी पाण्याचे योग्य नियोजन व काकडी पिकावरील रोगनियंत्रणदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यामध्ये भुरी, करपा, दावण्या या रोगांपासून, तर लाल भुंगे व कीडमाशी या कीटकांपासून काकडी पिकाचे प्राधान्याने संरक्षण करणे आवश्यक असून या रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव काकडीवर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

अशी केली लागवड- जमिनीची चांगली नांगरट करावी. त्यानंतर जमीन तापू द्यावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.- कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी २५ ते ३० टन शेणखत प्रति हेक्टर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. त्यानंतर जमीन सपाट करावी.लागवडीसाठी सरीच्या मध्यभागी दोन वेलीतील अंतर ४५ ते ६० सें.मी. प्रत्येक ठिकाणी ३ ते ४ ठेवून बिया टोकाव्यात. बियांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे.लागवडीनंतर २५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन जोमदार रोपे ठेवावीत. लागवडीसाठी सरासरी प्रतिहेक्टर २ ते २.५ किलो बियाणे वापरावे.

अधिक वाचा: पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन

टॅग्स :शेतकरीशेतीपीकभाज्यापेरणीपीक व्यवस्थापनलागवड, मशागतइंदापूर