Lokmat Agro >लै भारी > Success Story : सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी

Success Story : सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी

Success Story: Proper irrigation techniques and effective crop management worked; Arunrao's strong performance in wheat production | Success Story : सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी

Success Story : सिंचनाचे योग्य तंत्र अन् प्रभावी पीक व्यवस्थापन आले कामी; अरुणरावांची गहू उत्पादनात जोरदार कामगिरी

Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे.

Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यादवकुमार शिंदे 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे.

बाजारातगहू विक्रीतून शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपये मिळाले आहेत. यासाठी त्यांना २५ हजार रुपये खर्च आला आहे. हा प्रयोग या गावात प्रथमच करण्यात आला असून तो यशस्वी ठरला आहे.

सोयगाव येथील शेतकरी अरुण सोहनी यांनी खरिपात मक्याचे उत्पन्न घेतले होते. त्यानंतर त्यांनी मक्याच्या जागेवर पुन्हा रब्बी हंगामात शरबती वाणाच्या गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या पिकाची सोमवारी (दि. १७) काढणी करण्यात आली.

या पिकातून त्यांना तब्बल चाळीस क्विंटल उत्पन्न झाले. बदलते वातावरण, अवेळी झालेला पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकऱ्याने तालुका कृषी विभागाकडून या पिकाबाबत मार्गदर्शन घेतले होते. त्यामुळे या पिकातून भरघोस उत्पन्न झाले असल्याचे सोहनी सांगतात.

२५ हजार रुपये उत्पादन खर्च

सोहनी यांना गहू पिकाची पेरणी, खुरपणी, काढणी, खत, पाणी यासाठी त्यांना २५ हजार रुपये खर्च आला आहे.

रब्बी हंगामात गव्हाची ठिबक सिंचनावर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यांत ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे. बाजारात गहू विक्रीतून शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपये मिळाले आहेत. यासाठी त्यांना २५ हजार रुपये खर्च आला आहे. - अरुण सोहनी, प्रयोगशील शेतकरी, सोयगाव.

हेही वाचा : Agriculture Success Story : कृषी शिक्षणाचा होतोय फायदा; तुर उत्पादनात युवराजने मिळविला विशेष हातखंडा

Web Title: Success Story: Proper irrigation techniques and effective crop management worked; Arunrao's strong performance in wheat production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.