lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

Sarpanchbai of Lakhewadi formed a women's army for vineyard management | द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल.

द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल.

शेअर :

Join us
Join usNext

शैलेश काटे
द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल अशा पद्धतीने त्यांच्या कामांचे व्यवस्थापन करण्याची किमया लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी करून दाखविली आहे.

द्राक्ष शेतीमध्ये द्राक्ष छाटणी, वांझ काडी काढणे, विरळणी, घड बांधणी, द्राक्ष माल काढणी व त्यानंतर निर्यातीचे पॅकिंग ही महत्त्वाची कामे असतात. त्यातील बहुतेक कामे त्या कामांमध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करत असतात.

ही कामे महिलांनी केली तर ती अधिक झटपट होतील, त्याचबरोबर महिलांना वर्षभर पुरेल एवढा रोजगार निर्माण होईल, त्या प्रमाणात पैसा मिळून त्यांच्या संसाराला चांगला हातभार लागेल या दृष्टिकोनातून लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी महिला मजुरांना रोजगारनिर्मितीची ही कला शिकवण्याचा निर्णय घेतला, त्या महिलांना जमवून, महत्त्व पटवून देऊन त्यांनी ती बाब साध्य केली.

विशेष म्हणजे ढोले यांच्याकडे जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्षपद आहे. तेथे त्यांनी शिक्षणाचे प्रचंड मोठे काम हाती घेतले आहे. तो व्याप सांभाळत त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे यशस्विरित्या पार पाडले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चित्रलेखा ढोले यांच्या हस्ते या महिला मजुरांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ कृषितज्ज्ञ राजेंद्र वाघमोडे यांनी देखील महिलांकरवी होत असलेल्या द्राक्ष बागेतील कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. औद्योगिक, सेवा क्षेत्र असो की शेतीमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.

फळ छाटणीनंतर पानगळ करणे
बागेत खरड छाटणीनंतर लवकर व एकसारख्या फुटी मिळण्याकरिता महत्वाचे म्हणजे काडीवरील डोळे तपासायला हवे हा डोळा जितका जास्त वेळ उन्हात राहील तितका व्यवस्थित व त्याचा परिणाम बागेमध्ये फुटी निघण्यास होईल. याकरिता बागेमध्ये पानगळ करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनीही पानगळ फळ छाटणीच्या १५ ते २० दिवस अगोदर करणे गरजेचे असते.

अशी करा द्राक्ष बागेची छाटणी
-
द्राक्ष बागेची छाटणी घेण्याकरिता डोळे फुगलेले असणे महत्त्वाचे आहे आणि अशाच परिस्थितीत फळ छाटणी घ्यावी.
- अन्यथा, दोन ते तीन दिवस पुन्हा थांबावे त्यासाठी सरळ काळी व सबकेन अशा दोन प्रकारच्या काड्या बागेमध्ये दिसून येतील.
- या काड्या शक्यतो डोळे तपासणी अहवाल नुसारच छाटून घ्यावेत.
- यामध्ये सबकेन काडीवर शेजारी एक डोळा राखूनच छाटणी करून घ्यावी, तर सरळ काडी असलेल्या बागेत काडीवर ज्या ठिकाणी दोन झाडांमधील अंतर कमी असेल अशा ठिकाणी छाटणी केली तरी चालेल.

Web Title: Sarpanchbai of Lakhewadi formed a women's army for vineyard management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.