संदीप कुंभारमायणी: नोकरी केल्यानंतरही शेतीकडे वळून ती यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनीही एक आदर्श निर्माण केला आहे.
सैन्यात २० वर्षे सेवा पूर्ण करून हवालदार पदावरून झाल्यानंतर निवृत्त इतर ठिकाणी नोकरी न करता त्यांनी शेतीबरोबरगायी पालन सुरू केले.
ते गाईचे दूध व शेण खतातून वर्षाला ते सात ते नऊ लाख रुपयांची कमाई करत आहेत. आजही अनेक शेतकरी परवडत नाही म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करतात.
मात्र, खटाव तालुक्यातील मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनी सैन्य दलामध्ये २० वर्षे सेवा केली. यामध्ये जम्मू काश्मीर, लडाख, श्रीनगर, विहार, राजस्थान, महाराष्ट्र आदी ठिकाणी आपले कर्तव्य बजावले.
हवालदार पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली. सेवानिवृत्तीनंतर गावी आले. आई-वडील शेती व्यवसाय करत होते. पारंपरिक शेती व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची जिद्द मनात घेऊन त्यांनी शेतीबरोबर पशुधन पाळण्याचा निर्णय घेतला.
साध्या पद्धतीने गायींसाठी गोठा तयार केला. या गोठ्यामध्ये असणाऱ्या गायींचे रोज सकाळ-संध्याकाळचे मिळून सुमारे ८० ते ९० लिटर दूध निघत आहे.
सध्या गायीच्या दुधाला लिटरला ३५ ते ४० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. त्यामुळे प्रतिदिन साधारण दोन ते तीन हजार रुपये दुधातून उत्पादन येत आहे.
त्यामुळे वर्षाला सरासरी सात ते नऊ लाख रुपये या दुग्धोत्पदानातून मिळत आहेत. या शिवाय गायीपासून मिळणारे शेणखत ही फायदेशीर ठरते.
कारण, शेणखतातून वर्षभराचा गायींच्या चाऱ्यासाठी येणारा खर्च भागण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या खाद्याचा ही फारसा खर्च जाणवत नाही. शेतीबरोबरच गायी पाळण्याचा व्यवसाय सुरू केल्याने आर्थिक स्थिरता आलेली आहे.
दररोज २० लिटर दूध◼️ सकाळ-संध्याकाळचे मिळून ८० ते ९० लिटर दूध निघत आहे.◼️ सध्या गायीच्या दुधाला लिटरला ३५ ते ४० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे.◼️ त्यामुळे प्रतिदिन साधारण दोन ते तीन हजार रुपये दुधातून उत्पादन येत आहे.◼️ त्यामुळे वर्षाला सरासरी सात ते नऊ लाख रुपये या दुग्धोत्पदानातून मिळत आहेत.
सेवानिवृत्तीनंतर इतर ठिकाणी आठ ते दहा तास नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत तेवढे कष्ट घेतले तर नोकरीपेक्षा जास्त उत्पादन निघेल या उद्देशाने गायी पालन सुरू केले. आज या गायी पालनातून वर्षाला सात ते नऊ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. तरुणांनीही नोकरीच्या शोधात न राहता शेतीबरोबर जोड व्यवसाय केल्यास कुटुंबाची आर्थिक सुधारणा होते. तसेच एक प्रतिष्ठा ही मिळते. - सचिन माने-पाटील, शेतकरी, मायणी
अधिक वाचा: थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी