युनूस नदाफ
पार्डी :
अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी (Farmer) शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून एका तोडणीस २५ हजाराचे उत्पादन काढले आहे. आतापर्यंत तीन तोडण्या झाल्या आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्याच्या संसाराला शेवग्यानी आधार दिला आहे.
शेवग्याच्या शेंगा (Shevgyachya Shenga), पाने, कोवळ्या फ़ांद्या आणि बियामध्ये (Seeds) मुबलक प्रमाणात पोषक घटक असल्याने यांचे सेवन केले जाते आणि अनेकजण शेंगाची भाजीचे सेवन खातात.
शेवग्याच्या पानात पोषक मुल्य असल्याने त्यांची पावडर तयार केली तर असे संजय सोनटक्के या शेतकऱ्याला वाटले. आणि मग त्यांनी शेवग्याच्या पानापासून पावडर (Powder) तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेल्या शेवगा पावडरला बाजारातून (Market) मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असून एका तोडणीला २५ हजाराचे उत्पादन मिळते.
तालुक्यातील चोरंबा येथील अल्पभूधारक शेतकरी संजय आनंदराव सोनटक्के यांनी ३० गुंठ्यात शेवग्याची ४ हजार ५०० झाडे लावली. पहिली तोडणी लागवडीच्या ६० दिवसानंतर केली आहे.
पहिल्या तोडणीला ८० किलो पाला निघाला यातून ११ किलो पावडर तयार करण्यात आली. बाजारात ११ हजार किलो प्रमाणे विकला गेला असल्याचे 'लोकमत ऍग्रो' शी सोनटक्के यांनी सांगितले.
जैविक आणि सेंद्रिय खताचा वापर केला जातो यामध्ये बेसन, गूळ, ताक, शिजवून घेतलेला भात, देशी गाईचे गोमूत्र या सर्वांचे २०० लिटर पाण्यात मिश्रण झाडाला दिले जाते तर लिंब, सीताफळ व जांभुळ या झाडाचा पाल्याचे मिश्रण करून फवारणी केली जाते.
यामुळे कमीत कमी खर्च येतो तसेच शेवग्याचा पाला तोडणे आणि वाळवणे हे सर्व कामे घरातील सदस्य करीत असल्याने कुटूंबातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
सुरुवातीला शेवग्याच्या झाडावरून निरोगी व स्वच्छ पाने काढली जातात स्वच्छ काढलेली पाने मिठाच्या पाण्यात व नंतर स्वच्छ पाण्यात धुवून घेतली जातात पाने धुतल्यानंतर पानांला वाळविले जातात, वाळलेल्या पानाची पावडर तयार केली जाते.
पावडर पाऊचमध्ये भरली जाते, यामध्ये १०० ग्रॅम २५० ग्रॅम आणि ५०० ग्रॅमचे पाऊच तयार केली जाते हे सर्व कामे कुटूंबातील महिला सदस्य करीत असल्याने त्यांनाही लघुउद्योग उपलब्ध झाला आहे.
शेवग्यातून मिळाला रोजगार
* ६० दिवसानंतर तोडणी एक तोडणीस २५ हजार रुपये नफा आतापर्यंत तीन तोडणी झाली आहे.
* घरातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला तसेच बाहेरच्या दोन महिलांना रोजगार दिला आहे.