Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Batata Chips Business : बटाट्याची शेती केली, भाव मिळेना, शेतकऱ्याने शक्कल लढवली, चिप्स व्यवसायातून झाला मालामाल

Batata Chips Business : बटाट्याची शेती केली, भाव मिळेना, शेतकऱ्याने शक्कल लढवली, चिप्स व्यवसायातून झाला मालामाल

Latest news Potato farming, no price, farmer struggled, got rich from chips business | Batata Chips Business : बटाट्याची शेती केली, भाव मिळेना, शेतकऱ्याने शक्कल लढवली, चिप्स व्यवसायातून झाला मालामाल

Batata Chips Business : बटाट्याची शेती केली, भाव मिळेना, शेतकऱ्याने शक्कल लढवली, चिप्स व्यवसायातून झाला मालामाल

Batata Chips Business : उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले. व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्यापेक्षा देवरवाडे यांनी धाडसी निर्णय घेतला.

Batata Chips Business : उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले. व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्यापेक्षा देवरवाडे यांनी धाडसी निर्णय घेतला.

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई :
बाजारात बटाट्याला मातीमोल भाव मिळत असल्याने काढणी व वाहतूक खर्चही निघेना. त्यामुळे शक्कल लढवत बटाट्याचे चिप्स निर्मिती सुरू केली. मग मात्र दामच दाम मिळू लागला. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी ही किमया साध्य केली.

शेती परवडत नाही, अशी ओरड सुरू असतानाच रवींद्र देवरवाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत नवा आदर्श निर्माण केला. त्यांनी केवळ ३० गुंठे क्षेत्रात ऊस आणि मिश्र आंतरपिकांची सांगड घालत, बाजारभावावर अवलंबून न राहता स्वतःच मालावर प्रक्रिया करून ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न मिळवले.

केवळ ३० गुंठ्यातून विक्रमी उत्पादन रवींद्र देवरवाडे यांनी घेतले. ३०० किलो लसूण उत्पादन झाले. भाव १५० रुपये प्रतिकिलो मिळाला. कांदा १५०० किलो झाला. भाव १० रुपये प्रतिकिलो मिळाला. तर बटाट्याचे एकूण ६ टन उत्पादन घेतले.

धाडस केले, नफा वाढला
बाजारपेठेत बटाट्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले. व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्यापेक्षा देवरवाडे यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पिकवलेल्या ६ टन बटाट्यांपैकी ३ टन बटाटे विकले. तर उर्वरित १५०० किलो बटाट्यांवर स्वतःच प्रक्रिया करून त्याचे 'चिप्स' तयार केले. ज्या बटाट्याला बाजारात भाव नव्हता, त्या बटाट्यापासून बनवलेल्या चिप्सला आता २०० ते २५० रुपये किलो असा उच्चांकी दर मिळत आहे. या मूल्यवर्धनामुळे शेतकऱ्याचा नफा अनेक पटींनी वाढला.

नियोजनबद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग
खर्च वजा जाता केवळ या ३० गुंठ्यातील आंतरपिकांमधून देवरवाडे यांना ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मुख्य पीक असलेला ऊस अद्याप शेतातच असून, त्याचे उत्पन्न वेगळे मिळणार आहे. कमी क्षेत्रात नियोजनबद्ध शेती आणि शेतीमालावर प्रक्रिया केल्यास शेतकरी खन्य अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, हेच रवींद्र देवरवाडे यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे.

असा वाचवला उत्पादन खर्च
देवरवाडे यांनी आपल्या ३० गुंठे उसाच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बायोचार, बायोमिक्स आणि प्रोम यासारख्या मिश्र खतांचा वापर केला. उसाच्या पिकात त्यांनी लसूण, कांदा आणि बटाटा ही आंतरपिके घेतली. एकाच खर्चात आणि एकाच मशागतीत सर्व पिकांना खत-पाणी मिळाल्याने उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला.

 

 

 Nafed Kanda Kharedi : नाफेडकडून कांदा खरेदीची निविदा प्रक्रिया जाहीर, किती टन कांदा खरेदी होणार

 

Web Title : आलू किसान बना चिप्स उद्यमी, कम कीमतों को मात देकर समृद्ध हुआ।

Web Summary : आलू की कम कीमतों से जूझते हुए, किसान रवींद्र देवरवाडे ने चिप्स का व्यवसाय शुरू किया। इससे मुनाफा बढ़ा, ₹200-₹250/kg की कमाई हुई। अंतरफसल से आय और बढ़ी। उनकी सफलता कृषि में मूल्यवर्धन को दर्शाती है।

Web Title : Potato farmer turns chips entrepreneur, overcomes low prices, prospers.

Web Summary : Facing low potato prices, farmer Ravindra Deorwade innovatively started a chips business. This boosted profits, earning ₹200-₹250/kg. Intercropping further increased income. His success showcases value addition in agriculture.